संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. साक्षरतेचा प्रचार,प्रसार केला.महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते असे मौलिक प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका शर्वरी सरोदे यांनी आज कामठी येथील पटेल न्यूज पेपर एजन्सी कार्यालयात आयोजित संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
दरम्यान ज्येष्ठ समाजसेविका संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून सामूहिक अभिवादन वाहण्यात आले. याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे संयोजक राजेश गजभिये, विजय जैस्वाल, माजी नगरसेवक विकास रंगारी, सुरेश अढाऊ, आशिष मेश्राम,कृष्णा पटेल, गजेश यादव, अनिरुद्ध तांबे,मंगेश खांडेकर, सलमान अब्बास, गीतेश सुखदेवें, प्रमोद खोब्रागडे,आनंद गेडाम,सुमित गेडाम,कोमल लेंढारे, उमाशंकर भिवगडे, राजू बोरकर, सलीम अब्बास, शकील आदी उपस्थित होते.