हुडकेश्वरमध्ये बाबा जुमदेवजी जयंती उत्सव रविवारपासून

– सोमवारला शोभायात्रेचे आयोजन

नागपूर :- मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्ताने परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगरच्या आदेशान्वये परमपूज्य परमाता एक सेवक गट क्र. १० हुडकेश्वर बुथ यांच्यावतीने बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्ताने विविध धार्मिक व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २ एप्रिलपासून या कार्यक्रमांची सुरुवात होणार असून, ३ एप्रिलला जयंतीदिनी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

अंधश्रध्दा निर्मुलन, व्यसनमुक्त समाज तसेव आदर्श मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणाºया बाबा जुमदेवजी यांची ३ एप्रिल २०२३ रोजी १०२ वी जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमिवर गट क्र. १० च्यावतीने मार्गदर्शक गोविंदराव सोनवाने, रामाजी भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली व दशरथ ठाकरे, लक्ष्मण गोंडाणे, जागेश्वर कुंभारे यांच्या नेतृत्वात रविवार २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतापासून सदगुरु सोसायटी हुडकेश्वर (बु.) येथील प्रशांत ठाकरे यांच्याकडे गट क्र. १० च्यावतीने विविध धार्मिक व लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोमवार ३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्ताने प्रशांत ठाकरे यांच्या निवासस्थानाहून वर्धमाननगर मानव मंदिरापर्यंत मानव धर्माची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. हुडकेश्वर (बु.) येथून सुरु होणारी ही शोभायात्रा म्हाळगीनगर, सुभेदार लेआऊट, दत्तात्रयनगर, भांडे प्लॉट चौक, नंदनवन, टेलिफोन एक्सचेंज चौक असे मार्गभ्रमण करुन वर्धमान नगर येथील मानव मंदिरातुन निघणाºया शोभायात्रेमध्ये सामिल होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६ वाजतानंतर गट क्र. १० च्यावतीने हुडकेश्वर (बु.) येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीमहोत्सवात जास्तीत जास्त सेवक, सेविकांनी सहभागी होण्याचे आवाहन गट क्र. १० चे मार्गदर्शक व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com