अमित स्पोर्ट्स अकादमी व युनिटी स्पोर्ट्सला जेतेपद खासदार क्रीडा महोत्सव : योगासन स्पर्धा

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत योगासन स्पर्धेमध्ये अमित स्पोर्ट्स अकादमी आणि युनिटी स्पोर्ट्स असोसिएशनने जेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये योगासन स्पर्धा पार पडली.

दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश मोहगावकर, महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सचिव अमित मिश्रा, नागपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष आरती अग्रवाल, सचिव अनील मोहगावकर, माजी नगरसेवक भगवान मेंढे, नबीरा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग संचालक तेजसिंह जगदळे, समन्वयक संदेश खरे, भूषण टाके, सतीश भुरले उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये 13 ते 15 वर्ष वयोगटामध्ये मुलींमध्ये अमित स्पोर्ट्स अकादमी संघाने तर मुलांमध्ये युनिटी स्पोर्ट्स असोसिएशनने अव्‍वल स्थान प्राप्त करीत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. मुलींमध्ये ट्रॅडिशनल आणि आर्टिस्टीक प्रकारात अमित स्पोर्ट्सने तर रिदमिक प्रकारात युनिटी स्पोर्ट्सने आघाडी घेतली. मुलांच्या गटात ट्रॅडिशनल आणि आर्टिस्टीक प्रकारात युनिटी स्पोर्ट्सने तर रिदमिकमध्ये नेहरू क्रीडा मंडळ संघाच्या खेळाडूने प्रथम स्थान प्राप्त केले.

स्पर्धेत 7 ते 9 वर्ष वयोगटात यशस्वी जीवतोडे ही सर्वाधिक कमी वयाची खेळाडू होती. तिने आर्टिस्टीक प्रकारात सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली.

स्पर्धेच्या समारोप प्रसंगी माजी नगरसेवक विजय (पिंटू) झलके, बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश मासुरकर, भाजपा युवा मोर्चाचे महामंत्री गुड्डू गोमासे, विनोद मेश्राम उपस्थित होते.

निकाल (सुवर्ण, रौप्य, कांस्य)

13 ते 15 वर्ष वयोगट : मुली

ट्रॅडिशनल

श्रावणी राखुंडे (अमित स्पोर्ट्स अकादमी) 126.5

याशिका बारापात्रे (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 124.5

वेदांती भुते (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 122

रिदमिक

याशिका बारापात्रे (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 254

स्वर्णिका नौकरकर (अमित स्पोर्ट्स अकादमी) २०६.५

आर्टिस्टीक

श्रावणी राखुंडे (अमित स्पोर्ट्स अकादमी) 134.5

हितांशी चौसी (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 128

वेदांती भुते (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 126

मुले :

ट्रॅडिशनल

श्रीराम सुपसांडे (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 128

ओम चौधरी (अमित स्पोर्ट्स अकादमी) 122.5

सम्राट डेलीकर (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 115

रिदमिक

विनय गोलाईत (नेहरू क्रीडा मंडळ) 211

कर्तव्य ठाकरे (अमित स्पोर्ट्स अकादमी) 211

सोहम भोगे (वायके ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट) 183

आर्टिस्टीक

श्रीराम सचिन सुपसांडे (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 142.5

ओम परसरामजी चौधरी (अमित स्पोर्ट्स अकादमी) 120

सम्राट डेलीकर (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 85

NewsToday24x7

Next Post

नागपूरकर औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरणचे स्वागत कक्ष

Thu Jan 25 , 2024
नागपूर :- महावितरणच्या नागपूर शहर मंडला अंतर्गत असलेल्या नागपूर शहर, हिंगणा व बुटीबोरी येथील औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज पुरवठा, वीज क्षमता वाढ व वीज पुरवठा तक्रारीचे तातडीने निराकरण होण्याच्या दृष्टीने गड्डीगोदाम येथील महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ येथे स्थापन करण्यात आलेल्या स्वागत कक्षाचे उद्घाटन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते नुकतेच करण्यत आले. बुटिबोरी मॅन्युफ़ॅक्टचरींग असोसिएशनचे राकेश सुराणा, पुनीत महाजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com