अधिवेशनाची तयारी अंतीम टप्यात, दोन दिवस दीड हजार पदाधिकारी करणार विचारमंथन

– ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या

अधिवेशनाच्या तयारीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला आढावा !

 बारामती :- ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, बैठक व्यवस्था आदींची पाहणी केली.

बारामतीत नुकतेच व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संपादक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, राज्य कोअर टीमचे सदस्य अरुण जैन, पत्रकार मिलिंद संघई, विदर्भाचे संघटक सिद्धार्थ आराख, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर बाहेकर, बारामतीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातून अधिवेशनासाठी येणाऱ्या पत्रकारांची निवास भोजन आदी व्यवस्था यासाठी विविध ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर गदिमा सभागृहात जाऊन कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीने बैठक घेतली. या बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या वेळेचे नियोजन, प्रत्येक विषयाची स्वतंत्र जबाबदारी, विविध सत्रांची आखणी, मान्यवरांच्या निवास व इतर व्यवस्था याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

नुकतेच अधिवेशनाच्या लोगोचेही प्रकाशन झालेले आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या तयारीला वेग आला असून राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांची व्यवस्था केली जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या अधिवेशनाला उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पत्रकारांना पेन्शन, आरोग्य, हक्काची घरे, प्रत्येक तालुका स्तरावर पत्रकार भवन, पत्रकारांना पेन्शन, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, आरोग्य आदी विषयांवर काम करण्याची योजना आखली जात आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे बारामतीत राज्याचे शिखर अधिवेशन होत आहे. देशातील सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष या अधिवेशनाच्या निमित्ताने बारामतीमध्ये येणार आहेत. पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी, नव्याने विकसित होत असलेल्या पत्रकारितेच्या तंत्रज्ञानासाठी या अधिवेशनामध्ये चर्चाविनिमय होणार आहे. यात काही ठराव घेतले जाणार आहेत, जे राज्य आणि केंद्र सरकारला दिले जाणार आहेत.

अधिवेशनाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नगर विकास मंत्र्यांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक

Fri Nov 17 , 2023
– क्षेपणभूमीवरील कचऱ्याची जलदगतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती;आठवडाभरात कृती आराखडा सादर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश  मुंबई :- मुंबईतील क्षेपणभूमीवरील (डंपिंग ग्राऊंड) साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती नेमून आठवडाभरात त्याचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबईतील मुलुंड, कांजुरमार्ग आणि देवनार या क्षेपणभूमीवरील हजारो टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com