संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी प्रतिनिधी १८ जुलै – नवी कामठी भागातील आंनद नगर, शिवनगर, विकतुबाबा नगर,सैलाब नगर, समता नगर, रामगढ येथील सखल भागात अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी गोरगरीबांच्या घरात शिरून अन्न धान्याचे नुकसान झाले त्यांना खावटी देण्यात यावी अशी मागणी भाजपा महामंत्री उज्ज्वल रायबोले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली.तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या आदेशानुसार नगर परिषद मुख्याधिकारी संदिप बोरकर यांनी त्यांच्या टीम सह घरोघरी जाऊन पाहणी केली परंतु महसूल विभागाने नुकसान भरपाई चे अर्ज अद्यापही भरले नाहीत.
दररोज पाऊस सुरू असून पानावर आणून खाणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या घरी खायला अन्न धान्य नाही त्यामुळे
त्रस्त नागरिकांनी आज सोमवारी नगर परिषद कार्यालयात भाजपा कामठी शहर महामंत्री उज्ज्वल रायबोले यांच्या नेतृत्वात न प चे कर निरीक्षक आबासो मुढे यांना निवेदन देऊन खावटी साठी शासना कडून मदतीची मागणी केली यावेळी चंद्रमणी बागडे,शँकर तांडेकर,राधेश्याम चव्हाण, वासुदेव धकाते,संजय रॉय,मुन्ना बारेकर,बादल नारायणे,शेख युसूफ, विमल बघेल,कल्पना खोब्रागडे, करिष्मा बारेकर, शमीम बानो, अंजुम मोहसीन खान, गुलशन अफरोज, रुबीना हसन, रेश्मा परवीन,अफसाना शेख,अरुणा मोहबे, सागरता चौरे, सरिता मोहबे,अनिता मालाधरे,रश्मी नाईक,सरिता जगणे, सविता टेकाम, रेश्मा परवीन,कविता शर्मा आदी उपस्थित होते.