मोटर सायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई 

नागपूर :- नागपुर ग्रामिण जिल्हयात मोटरसायकल चोरींच्या घटना वाढत असल्याने त्यावर आळा घालण्या करीता पोलीस अधिक्षक विशाल आनंद नागपुर ग्रामिण यांनी दिलेल्या सुचने वरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांनी त्याकरीता विशेष पथक स्थापन केले होते. दिनांक १६/०५/२०२३ रोजी सदर पथकाने गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे बुट्टीबोरी परिसरातून संशयीत इसम नामे १) अभिषेक रामरतन कुनै वय २० वर्ष रा. बोरखेडी फाटक जवळ बुट्टीबोरी याला ताब्यात घेतले. त्याने विचारपुस दरम्यान सदर मोटर सायकलींची चोरी ही मौजमस्ती करीता पैशाची आवश्यकता असल्याने केल्याचे सांगीतले. त्यानुसार त्याने नागपुर ग्रामिण तसेच नागपुर शहर येथून एकुण ०५ मोटर सायकली चोरी केल्याचे सांगीतले. त्याचे ताब्यातुन पोलीस ठाणे बुट्टीबोरी येथुन चोरी केलेल्या ०४ मोटर सायकल तसेच नागपुर शहर पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतुन चोरी केलेली मोटर सायकल अशा एकुण ५ मोटर सायकली किमती अंदाजे २,१०,००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून नमुद आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील तपास करीता आरोपीची वैद्यकिय तपासणी करून पोलीस ठाणे बुट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

उडकीस आलेले मोटर सायकल चोरीचे गुन्हे

१) पोलीस ठाणे बुटीबोरी अप. क्र. १०६/२३ कलम ३७९ भा.द.वि.

२) पोलीस ठाणे बुटीबोरी अप. क्र. २९३/२३ कलम ३७९ भा.द.वि.

३) पोलीस ठाणे बुटीबोरी अप. क्र. २९४ /२३ कलम ३७९ भा.द.वि. १४) पोलीस ठाणे बुटीबोरी अप.क्र. २९५ / २३ कलम ३७९ भा.द.वि.

५) पोलीस ठाणे बेलतरोडी नागपूर शहर अप. क्र. ४८/२० कलम ३७९ भा.द.वि. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस निरिक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, पोलीस हवालदार मिलिंद नांदुरकर, महेश जाधव, मयूर ढेकळे, पोलीस नायक अमृत किनगे, रोहन डाखोरे यांचे पथकाने केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com