राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या (IRS) 76 व्या बॅचच्या प्रवेश प्रशिक्षणाचे उद्घाटन 28 डिसेंबर रोजी

नागपूर :-भारतीय महसूल सेवेतील 59 आय आर एस अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेतील 02 अधिकाऱ्यांच्या 76 व्या तुकडीसाठी प्रवेश प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा 28 डिसेंबर 2022 बुधवार रोजी – राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस – एनएडीटी नागपूर येथे होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सदस्या अनुजा सारंगी, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर ही भारत सरकारच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठी असणारी सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. नागरी सेवा परीक्षेद्वारे भरती झालेले आयआरएस अधिकारी 16 महिन्यांचे प्रवेश पुर्व प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना प्राप्तिकर कायदे, न्यायशास्त्र तसेच संबंधित कायदे, सामान्य कायदे आणि व्यवसाय कायदे यासंबंधी विशेष माहिती दिली जाते.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना वित्त आणि लेखा प्रणालीवर सखोल प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थींना करचोरी आणि मनी लाँड्रिंगसह कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये तपासासाठी तयार करण्यासाठी फायनान्शियल फॉरेन्सिक्स आणि सायबर फॉरेन्सिक्समधील तपशील देखील दिले जातात. प्रशिक्षणार्थी यांना विशेषतः करदाता सेवा आणि इतर सार्वजनिक सेवा तसेच माहितीचा अधिकार इत्यादींबाबत संवेदनशील केल जाते. प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबींमध्ये आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसदेसह भारतातील विविध संवैधानिक संस्था तसेच आरबीआय , एसबीआय , एनएसडीएल सारख्या वैधानिक संस्थांशी ॲटेचमेंट कार्यक्रमांचाही समावेश यात असतो .

76 व्या तुकडीत 25 महिलांसह (41% प्रमाण ) 61 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. बॅचचे 38% अधिकारी प्रशिक्षणार्थी ग्रामीण पार्श्वभूमीतील आहेत आणि उर्वरित शहरी किंवा निमशहरी पार्श्वभूमीतील आहेत. अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा संबंध आहे, सुमारे 2/3 अधिकारी प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत. सुमारे अर्ध्या बॅचसाठी ही त्यांची पहिलीच नोकरी आहे.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि दर्जेदार करदाता सेवा देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये सदर प्रशिक्षण सुनिश्चित करते. इंडक्शन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, अधिकारी प्रशिक्षणार्थींना संपूर्ण भारतातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com