जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

उमरेड :- अंतर्गत ०१ कि.मी अंतरावर जिचकार सभागृहच्या समोर रोडवर इतवारी पेठ उमरेड येथे दिनांक १६/०५/२०२३ चे १७/०० वा. ते १७/१५ वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे- अश्विन नत्थुजी राऊत, वय २८ व रा. उकडी ता. भिवापूर जि. नागपुर हा त्याचे गावात राहणारी प्रेमा मरस्कोल्हे हिचे लग्न जिचकार सभागृह इतवारी पेठ उमरेड येथे असल्याने आरोपी नामे रामा खटट्टु आदमने, वय ४३ वर्ष रा. अभ्यंकर चौक इतवारी पेठ उमरेड लग्न सभागृहात दारू पिऊन अंगात मळकट फाटलेले कपडे घातलेले दिसुन येत होता. तेव्हा त्यास फिर्यादीचे भावाने आरोपीस हटकुन असे म्हटले की “तु इथुन निघुन जा” असे म्हणत सभागृह बाहेर काढले. तोच राग मनात धरून सभागृह बाहेर वडाचे झाडाचे सिमेंट ओट्यावर बसलेल्या आरोपीने फिर्यादी व त्याचे भाऊ यांना बघताच “थांब तुमचा मुडदा पाडतो अशी धमकी देवून निघुन गेला व थोडया वेळाने परत येउन फिर्यादीचे पाठीमागुन येऊन जिवाने ठार मारण्याच्या उददेशाने डोक्यावर कुल्हाडीने वार करून फिर्यादीस गंभीर जखमी केले..

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुद्ध कलम ३०७, ५०६ भादव, अन्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले पोस्टे उमरेड हे करीत आहे..

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com