जबरी चोरी करणारा विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात व वाहन चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस

नागपूर :-  फिर्यादी नवीला उमेर शेख वय २९ वर्ष, रा. दिक्षीत नगर, कामगार नगर चौक, येथे किरायाने, नागपूर या थ्रीव्हिीलर अॅटोमध्ये बसुन आपले कामाचे ठिकाणी रामदासपेठ येथे जात असतांना पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत, खालसा गेट, कामठी रोड जवळ त्या आपले फोनवर बोलत असतांना अँटोचे पाठीमागुन एक काळया रंगाची स्प्लेंडर गाडीवर दोन अनोळखी इसमांनी येवून फिर्यादीचा मोबाईल किमती अंदाजे १५,०००/- हा हिसकावून नेला. फिर्यादीचे अशा रिपोर्टवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे कलम ३९२, ३४ भा. दं. वो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस ठाणे पाचपावली येथील अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून वसंत बालक वय १५ वर्ष यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साधिदार विधीग्रास्त बालक यांचे सोबत मिळून केल्याची सांगीतले. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पोलीस ठाणे शांतीनगर, अंबाझरी, सदर व तहसिल हद्दीत वाहन चोरी केल्याचे सांगीतले विधीसंघर्षग्रस्त बालका जवळून गुन्हयातील हिसकावुन नेलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर प्लस गाड़ी तसेच चोरी केलेले वाहन, ०१ यासह, ०१ जुपीटर गाड़ी ०१ अॅक्टीव्हा, ०१ स्प्लेंडर गाडी असे एकुण ०५ वाहन व एक मोबाईल असा एकूण २,५०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी गोरख भामरे पोलीस उप-आयुक्त (परिक. ३) नरेन्द्र हिवरे सहा. पोलीस आयुक्त लकडगंज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि वैभव जाधव, पोनि (गुन्हे) महेन्द्र आंभोरे, पोहवा दिलीप पवार, नापोअ. प्रकाश पखान, वासुदेव जयपूरकर, अंकुश राठोड, गणेश ठाकरे, पोन हितेश खरखंडे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रतिबंधीत तंबाखू विक्री करीता साठा करणाऱ्या आरोपींना अटक, ९,००,०२४/- रू. चा मुद्देमाल जप्त

Mon Jul 10 , 2023
नागपूर :- दिनांक ०८,०७,२०२३ रोजी पोलीस ठाणे यशोधरानगर येथील तपास पथक पेट्रोलीग करीत असता संघर्ष नगर येथे एका स्कोडा गाडीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाकुजन्य पदार्थ विक्री करीता, पॅकिंग करून साठा करून ठेवल्याचे खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन धाड टाकली असता नमुद ठिकाणी आरोपी १) रजत राजेंद्र बोनगिरी, वय २५ वर्ष, रा. गौतम नगर, डिलक्स सलुन जवळ, गड्डीगोदाम सदर, २) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com