घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- पाचपावली पोलीसांचे तपास पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून गंगा बारसे नगर, कलकत्ता रेल्वे लाईन जवळ, सार्वजनीक ठिकाणी हातात शस्त्र घेवुन येणारे जाणारे लोकांना शिवीगाळ करणारे दोन इसमांचा पाठलाग करून ताब्यात घेतले, आरोपी क. १ हा हातात तलवार घेवुन समक्ष मिळाल्याने तलवार ताब्यात घेतली, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी आपले नाव १) ललीत अजय भामोडे, वय २५ वर्षे, रा. महाल, भाजी मंडी, पोलीस ठाणे कोतवाली, नागपूर २) महेश गोपाल सोनटक्के वय २१ वर्ष रा. जुनी बस्ती, हनुमान मंदीर जवळ, वाठोडा, नागपूर असे सांगीतले. त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपी क. २ याचे जवळुन एक मोबाईल किमती १५,०००/- रू चा मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला.

आरोपी हे कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्‌देशाने शस्त्रसह समक्ष मिळाल्याने, तसेच त्यांनी सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने पोहवा पवन भटकर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे पोउपनि शेख यांनी आरोपीविरूध्द कलम ४, २५ भा.ह. का., सहकलम १३५ म.पो.का, अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा उद्घाटन

Thu Feb 8 , 2024
नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना थेट लाभ मिळावा या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत बुधवार (ता ७) रोजी गांधीबाग झोन येथील भूतेश्वर नगर मैदान येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर दयाशंकर तिवारी, मनपाचे सहायक आयुक्त गणेश राठोड, घनशाम पंधरे यांच्यासह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com