विनयभंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

सावनेर :- फिर्यादी यांनी दिनांक २८/१०/२०२३ रोजी पोलीस स्टेशनला येवून तक्रार दिली की, त्यांची मुलगी वय १७ वर्षे हीची डिसेंबर सन २०२० पासून शुभम राजू राजपुत, वय २२ वर्ष यांचे सोबत ओळखी झाले पासून आरोपीने त्यांचे घरी येवून फिर्यादीला तुमची मुलगी घरी आहे का? असे विचारून फिर्यादीच्या मुलीने फोन करून बोलावले असे खोटे सांगून फिर्यादीचे मुलीला मानसीक त्रास दिला. तसेच फिर्यादीची मुलगी ही शेतात जातांना वस्तीत असतांना आरोपीने तिचे जवळ जाण्यासाठी तीचा वारंवार पाठलाग केला व दिनांक २८/१०/२०२३ रोजी मध्यरात्री ००.३० वाजता दरम्यान शुभम राजपूत हा फिर्यादीचे घराचे आवारातील संडास मध्ये घुसून फिर्यादीच्या मुलीला तु मला मॅसेज केला म्हणून मी येथे आलो. असे म्हणून तीचे तोंड दाबून तीला पकडून ठेवून तिचे सोबत छेडखानी केली. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम ३५४, ३५४ भादवि सहकलम १२ पोक्सो कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास म.स.पो.नि. एम एम मोकाशे पो.स्टे. सावनेर हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नैसर्गीक आपत्तीमुळे शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचे आमीष देवून शेतकऱ्याना ११३,४६,९९,००३/-रुपयाचा अपहार करून फसवणुक करणारे मुख्य दोन आरोपी गजाआड

Mon Oct 30 , 2023
– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणची कारवाई मौदा :- पोलीस स्टेशन मौदा जिल्हा नागपुर ग्रामीण येथे नागपुर जिल्हयातील पिडीत १५८ शेतकरी यांना नैसर्गीक आपत्तीमुळे शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचे आमीष देवून त्यांचेकडुन विश्वासाने संबंधीत कागदपत्र घेवुन शेतकरी यांचे नावे करोडो रूपयाचे बोगस कर्ज प्रकरणे तयार करून ते बँक रेकॉर्डवर खरे असल्याचे दाखवून १९३. ४६. ९९.००३ / रूपयाचा अपहार करून फसवणुक केल्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com