कोदामेढी :- भंडारा येथील नागपूर- भंडारा महामार्ग लगत असणाऱ्या जि. प. चौक समोरील बँक ऑफ बडोदा शाखेतील प्रिंटिंग मशीन नेहमी बंद रहात असल्याने ग्राहक त्रस्त आहेत .
डिजिटल युग असल्याने ऑनलाईन ट्रांझ्याक्शनची संख्या वाढल्याने बँकेत गर्दीचे प्रमाण कमी झालेले आहेत. तरीदेखील कोदामेंढी परिसरातील या शाखेत आधार लिंक असलेले ग्राहक,भंडारा व भंडारा परिसरातील शाखेतील ग्राहक असलेले पासबुकधारक नागरिक इतर कामानिमित्त पासबुक अपडेट करण्यासाठी गेले असता नेहमी या शाखेतील प्रिंटिंग करून देणारे बँकेचे अधिकारी सध्या पासबुक प्रिंटिंग मशीन बंद आहे पुढच्या व्हिजीटला पासबुक प्रिंटिंग करून देऊ असे आश्वासने देतात .मात्र पुढच्या व्हिजीटलाही परिस्थिती जैसे थेच राहत असल्याने व आता तर बँकेत पासबुक प्निटर बंद आहे असा फलकच लागल्याने ग्राहक त्रस्त असून संबंधित वरिष्ठ प्रशासन विभाग व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पासबुक प्रिंटिंग मशीनची सुविधा बँकेतर्फे नियमित देण्यात यावी ,अशी मागणी या शाखेतील कोदामेंढी परिसरातील , भंडारा व भंडारा परिसरातील ग्राहकांनी केली आहे. पासबुक प्रिंटिंग मशीन नेहमी नादुरुस्त असण्याच्या तक्रारी इथेच नव्हे तर गावागावात ,तालुका तालुक्यात ,जिल्हा जिल्ह्यात असणाऱ्या मोजक्याच बँका सोडून बाकी सर्व बँकेच्या शाखेत असण्याच्या तक्रारी संबंधित ग्राहक सांगत आहेत, हे विशेष!