– मतदान प्रक्रियेकरीता प्रशासन सज्ज
गडचिरोली :- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व EVMs/VVPATs मशिन तयार करण्याचे काम पुर्ण करणे आवश्यक असल्याने , निवडणूक निरीक्षक (सामान्य) विनीतकुमार (भा.प्र.से.) व निवडणूक निर्णय अधिकारी मानसी (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनात 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाचे EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व EVMs/VVPATs मशिन तयार करण्याचे काम स्थानिक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ,आरमोरी रोड ,देसाईगंज येथे पार पडले.
यावेळी रणजीत यादव (भा.प्र.से.),उपविभागीय अधिकारी कुरखेडा, प्रिती डूडूलकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार देसाईगंज, प्रशांत गड्डम, तहसिलदार तथा नोडल अधिकारी EVM, महेंद्र मांडवगडे, नायब तहसिलदार EVM,सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व Commissioning of EVMs/VVPATs करीता आदेशीत अधिकारी कर्मचारी तसेच उमेदवार किंवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघात एकुण 310 मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्याकरीता EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व Pairing प्रकिया तसेच सरमिसळ प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व EVMs-VVPATs मतदान केंद्र निहाय लावणेचे काम दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडले.
तसेच दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.00 वाजता पासुन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ,आरमोरी रोड ,देसाईगंज येथे Commissioning of EVMs/ VVPATs पार पडली . यामध्ये 310 मतदान केंद्राकरीता प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण 310 EVMs-VVPATs संच तसेच राखीव म्हणून 57 संच तयार करण्यात आले. पुन्हा जास्तीचे 27 VVPATs तयार करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेकरीता 35 टेबलची व्यवस्था करण्यात आली होती, त्यात क्षेत्रीय अधिकारी व तलाठी तसेच सहायकांची नियुक्ती करण्यात आलेली होती , तसेच 05 राखीव पथकात अधिकारी व कर्मचारी सुध्दा नियुक्त करण्यात आले होते. तसेच सर्व टेबलचे समन्वय साधण्याकरीता एकुण 05 रो-ऑफीसरची नियुक्ती व वेगवेगळी पथके तयार करुन जबाबदारी सोपविण्यात आली होती. तांत्रीक अडचणी सोडवण्याकरीता तसेच उमेदवारांचे निवडणूक चिन्ह Upload करण्याकरीता BELL कंपनीचे ईंजिनिअर्सची टिम सुध्दा उपस्थित होती.
EVM मशिन मतदानाकरीता तयार झाल्यानंतर 5% EVM मशीन एकुण 18 EVM मशीन उमेदवार व त्यांचे प्राधिकृत प्रतिनीधी यांचेद्वारा ईश्वरचिठ्ठया काढून मतदान केंद्रांची निवड करण्यात आली व त्या 18 EVM मशीनवर 1000 वेळा मतदान व मॉक पोल करुन स्लिप व CU मधील Result याचा मेळ घेण्यात येऊन , मॉक पोल मधील सर्व स्लिप नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर सर्व EVM मशीन सुरक्षा कक्षात सुरक्षितरित्या ठेवण्यात आले व सुरक्षा कक्ष शिलबंद करण्यात आले. सर्व प्रक्रियेदरम्यान उमेदवारांचे प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते .