– तोतया डबेवाला संघटना पदाधिकाऱ्यांपासून सावध रहा
– डबेवाले संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांचे आवाहन
मुंबई :- काही तथाकथित डबेवाला संघटनांचे पदाधिकारी हे मुंबईच्या डबेवाल्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिला असल्याचे गैरसमज पसरवत असले तरी डबेवाल्यांच्या अधिकृत संघटनेने भारतीय जनता पार्टी आणि महायुती उमेदवारांनाच पाठिंबा दिला असल्याचे, उत्तर मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महायुती सरकारने डबेवाल्यांसाठी घरे देण्यासह जी कामे केली ती पाहता हा पाठिंबा देण्यात आल्याचेही मुके यांनी सांगितले.
आमची संघटना 1890 पासून कार्यरत आहे. गेल्या 134 वर्षांमध्ये आजतागायत आमच्या संघटनेने कुठल्याही राजकीय संघटनेला पाठिंबा दिला नव्हता. मात्र डबेवाल्यांसाठी महायुती सरकारने केलेली कामे पाहता आम्ही महायुतीला पाठिंबा देत असल्याचे मुके यांनी जाहीर केले.
स्वत:ला डबेवाल्यांचे नेते म्हणवून घेणारे काही जण ,काही अन्य राजकीय पक्षांना पाठिंबा दिल्याचे गैरसमज पसरवत आहेत. मात्र हे पदाधिकारी खरे नव्हे तर तोतये पदाधिकारी असून त्यांच्यावर डबेवाल्यांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. अफरातफरी सारख्या तक्रारींचा तपासही सुरू आहे. काही प्रकरणात तर गुन्हेही दाखल असल्याचे मुके यांनी सांगितले.