मतपेढीचे, जातीचे राजकारण करणा-यांना थारा देऊ नका,समृद्ध, संपन्न देश आणि राज्यासाठी महायुतीला कौल द्या

– दुर्गापूर येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

दुर्गापूर :- देश, राज्य आणि जिल्ह्याच्या गतिमान विकासासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार अविरत काम करत आहे. देशाला आत्मनिर्भर आणि जगातील तिसरी महाशक्ती बनवायचे असेल, राज्याचा, चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महायुतीला दुसरा पर्यायच नाही. मतपेढीचे आणि जातीजातीमध्ये विष कालवण्याचे हीन राजकारण करणा-यांना दूर लोटा आणि महायुतीला कौल द्या असे आवाहन केंद्रीय वाहतूक आणि रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले.

बल्लारपूर मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल, जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा आदी उपस्थित होते या निवडणुकीत मुनगंटीवार यांना निवडून आणाल तर यापुढे ही चंद्रपूर जिल्हा विकासाची ट्रेन तिप्पट वेगाने धावेल असा विश्वास ही गडकरी यांनी व्यक्त केला.

लोक कल्याणाच्या सरकारी योजनांचे लाभ जातीधर्मा पलिकडे जाऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार झटत आहे. मात्र विरोधकांना केवळ जातीपातीचे राजकारण करायचे आहे अशी टीका गडकरी यांनी केली. आज सर्वत्र पायाभूत सुविधा बळकटीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. शेतक-याला संपन्न करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. बांबू पासून मिथेनॉल, बायो एव्हिएशन इंधन निर्मिती चंद्रपूर येथे होत असून, शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता आणि इंधनदाता बनला आहे. बल्लारपूर येथे मिथेनॉल सोबतच, अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प होणार असल्याचेही ते म्हणाले. पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यामुळे आज ताडोबा व्याघ्र प्रकल्प जागतिक स्तरावर पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरला आहे. मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार सरकारच्या प्रयत्नामुळे ताडोबा जंगलात आज वायु आणि ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक गाड्या लवकरच धावणार आहेत असेही त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाच्या बळावर आणि मोदी सरकार आणि महायुती सरकारमुळे 2014 पूर्वी एक ही किमी चा राष्ट्रीय महामार्ग नसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आज डबल इंजिन सरकारमुळे तब्बल 474 किमी राष्ट्रीय महामार्ग तयार झाला आहे. नुकतेच नागपूर विमानतळाचे भूमीपूजन झाले. या विमानतळावरून शेतक-यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर पहिले विमान झेप घेईल हा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. 5 हजार कोटींची महामार्ग बांधणीची कामे मंजूर झाली आहेत. चंद्रपूर मध्ये पाण्यावर उतरणारी विमानसेवा ही लवकरच सुरू होईल असेही ते म्हणाले.

यावेळी गडकरी म्हणाले की चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासात मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याचे वनमंत्री या नात्याने पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन क्षेत्रात काम करत जिल्ह्याचा कायापालट केला आहे. वृक्ष लागवडीमध्ये त्यांनी जागतिक विक्रम केला आहे. विकासाची आस असलेली बल्लारपूरची जनता तळमळीने काम करणाऱ्या मुनगंटीवार यांना जनता प्रचंड बहुमताने विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा-महायुतीचा विजय महाराष्ट्राला नवी दिशा देणार! - डॉ. मोहन यादव यांचा विश्वास

Thu Nov 14 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी येथे चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रचारार्थ भव्य सभा  कामठी :- भाजपा सरकारने विविध कल्याणकारी योजनांद्वारे गरीब शेतकरी आणि महिलांच्या कल्याणासाठी महत्वाची पावले उचलली आहे. प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवण्यासाठी भाजपा सरकार काम करीत आहे. भाजपाचे ध्येय केवळ आर्थिक विकास नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनमानात सुधारणा करणे आहे. निवडणुकीत भाजपा-महायुतीच्या विजयाने महाराष्ट्राने देशाला दिशा देणारे राज्य असल्याचा विश्वास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com