स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी मानवी साखळी व मतदानाची शपथ

गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी स्वीप अंतर्गत नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात रोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत आज मतदार जनजागृतीच्या दृष्टीने 400 विद्यार्थ्यांद्वारे मानवी साखळी उपक्रम कमलताई मुंनघाटे हायस्कूलच्या प्रांगणात राबविण्यात आला तसेच मतदारांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.

स्वीप अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन मडावी, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे (माध्यमिक) व बाबासाहेब पवार (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, अमरसिंग गेडाम, मुख्याध्यापक स्मिता लडके, भैसारे,  गोरडवार, टप्पो आदींची उपस्थिती होती.

मानवी साखळी उपक्रमात गडचिरोली येथील संजीवनी हायस्कूल, नवजीवन हायस्कूल, प्रज्ञा कान्व्हेंट, कमलताई मुंनघाटे हायस्कूल या शाळेतील प्रत्येकी 100 विद्यार्थी याप्रमाणे एकूण 400 विद्यार्थ्यांद्वारे मतदान करण्याबाबतचे बोटाचे चिन्ह जमिनीवर साकारलेल्या व तिरंग्याचे रंगात सुशोभित केलेल्या गोलाकाराभोवती मानवी साखळी तयार करण्यात आली. याप्रसंगी वोट फॉर इंडिया, सर्वांनी मतदान करावे या घोषणा देण्यात येवून उपस्थित मतदारांना मतदान करण्याबाबतची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग येथील अधिकारी कर्मचारी आणि शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व EVMs/VVPATs मशिन तयार करण्याचे काम पुर्ण

Wed Nov 13 , 2024
– मतदान प्रक्रियेकरीता प्रशासन सज्ज गडचिरोली :-  भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व EVMs/VVPATs मशिन तयार करण्याचे काम पुर्ण करणे आवश्यक असल्याने , निवडणूक निरीक्षक (सामान्य) विनीतकुमार (भा.प्र.से.) व निवडणूक निर्णय अधिकारी मानसी (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com