नागपूर :- पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत प्लॉट नं. १०१, राज कॉम्प्लेक्स, कॅनरा बँक जवळ, अॅलेक्सीस हॉस्पीटल मागे, नागपूर येथे राहणाऱ्या २६ वर्षीय फिर्यादी हया घरी हजर असतांना, दिनांक ०६.१०.२०२४ चे २२.०० वा. ते दिनांक ०८१०.२०२४ चे २१.४८ वा. चे दरम्यान एका अज्ञात मोबाईल धारकाने फिर्यादीचे मोबाईलवर कॉल करून सांगीतले की, तुमचे पार्सल कुरीअरने आलेले आहे, त्या पार्सलवर पत्ता अपडेट करायचा आहे, असे सांगुन फिर्यादीचे मोवाईलवर लिंक पाठवुन, फिर्यादीस माहिती भरण्यास सांगुन फिर्यादीचे बैंक अकाऊंट हैक करून, फिर्यादीचे बँक खात्यातून आरोपीने त्याचे वेगवेगळया बँक खात्यात एकुण १,५९,०००/- रू. वळते करून फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिनांक २३.१०.२०२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे मानकापूर येथे सफी, नितीन वाघाडे यांनी आरोपीविरूध्द कलम ३१८(४) भा.न्या.सं. सहकलम ६६ (डी) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.