संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी तालुक्यात तंबाकू पदार्थ निर्मूलन अंमलबजावणीचा उडतोय बोजवारा,
– कामठी तालुक्यात सुगंधित भेसळ तंबाकू मिश्रित खर्रा विक्री जोमात
-घातक विषारी रासायनिक प्रक्रियेतील तंबाकू मिश्रित खर्रा मानवासाठी हानिकारक
-खर्रा खाणाऱ्यांनो सावधान अन्यथा दुर्धर आजार जडणार
कामठी ता प्र 21 :- महाराष्ट्रात सुगंधी तंबाकु तसेच गुटखाबंदी आहे मात्र अवैध मार्गाने सुगंधित तंबाकू ची आवक होत असून या सुगंधित तंबाकू मध्ये भेसळ करून खर्र्यात वापर करून सर्रास पणे खर्रा विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे ज्याकडे स्थानिक पोलीस तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. मागील काही दिवसात पोलीस विभाग तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने केलेल्या कारवाहिची धास्ती घेत या अवैध व्यवसायिकांनी हे सुगंधित तंबाकू विक्री व्यवसाय मौदा तालुक्यातील अरोली गावात वळविले असून तेथून हे अवैध व्यवसाय सुरू असल्याचे सांगण्यात येते.
सर्वोच्च न्यायालयाने शाळा महाविद्यालयाच्या 200 मीटर परिसरात तंबाकू , गुटखा, सिगारेटची विक्री केली जाऊ नये अशा प्रकारचा अध्यादेश काढला आहे यासंदर्भात कामठी तालुक्याचा विचार केला असता तालुक्यातील कित्येक शाळा, महाविद्यालय जवळ तंबाकू, गुटखा, सिगारेटची सर्रास विक्री होत असल्याने तालुक्यात तंबाकू पदार्थ निर्मूलन अंमलबजावणी चा बोजवारा उडत असल्याचे निदर्शनास येते .
तरुणांमध्ये तंबाकू, गुटखा, सिगारेट या पदार्थाचे प्रमाण वाढत आहे .शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत .शासनाला या उत्पादनातून कर मिळत असला तरी आरोग्याचा विचार करता यावर योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. काही सामाजिक संस्थांनी तंबाकू विक्रीवर बंदी घालण्यासाठी शासनावर दबाव टाकला असता तंबाकू उत्पादित वस्तूवर वैज्ञानिक इशाऱ्यांचा मजकूर व चित्रं प्रकाशित करून शासनाने दुष्परिणाम सांगितले आहे .शहरासह ग्रामीण भागात सुद्धा तंबाकू, गुटखा, सिगारेट आदी सेवन करण्याचे प्रमाण वाढीवर आहेत .शासन नियमाप्रमाणे या वस्तूची विक्री होत असली तरी मानवी आरोग्यासाठी या उत्पादनावर वैधानिक इशाऱ्यांचा मजकूर व चित्र करण्याची सक्ती शासनाने केली आहे.
तंबाकू मिश्रित उत्पादित पदार्थांचे शाळकरी मुलापासून तर वृद्धांपर्यंत व्यसन आहे.सार्वजनिक ठिकाणी युवक सिगारेटचे खुलेआम सेवन करीत धूम्रपान विरोधी कायद्याची पायामल्ली करीत असल्याची परिस्थिती कामठी बस स्टँड चौकात दिसून येते.या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पांनटपरिवर युवकांची मोठ्या प्रमानात गर्दी दिसून येते.व्यसनापासून दूर होणाऱ्या दुष्परिनामाची कल्पना असली तरी यूवक वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात आहे. कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त झालेल्या रुग्णामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.शासनाला या उत्पादनावर कर मिळत असला तरी आरोग्याचा विचार झाला पाहिजे..
कामठी तालुक्यात विक्री करीत असलेल्या खर्र्यात वापर करण्यात आलेली सुगंधित तंबाकू ही भेसळ केलेली असल्याची चर्चा नागरिकांत असून यामध्ये निकोटिन सह अन्य रासायनिक घटक मिसळविण्यात आल्याचे सांगण्यात येतात.कामठी तालुक्यात खर्रा खाणाऱ्यांची संख्या वाढत चालली असून याला कारणीभूत ही भेसळ करून बनावट रासायनिक मिश्रित तंबाकू चखळण्यासाठी खर्रा म्हणून दिली जात आहे .आधीच आरोग्यास हानिकारक असलेल्या तंबाकू मध्ये भेसळ केली जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित विभागाने अशी भेसळ करून खर्रा विक्री करणाऱ्यांवर कारवाहीचा बडगा बजवावा अशी मागणी जोर धरत आहे.तर कामठी च्या अवैध तंबाकू व्यवसायिकांनी हे सुगंधित तंबाकू विक्री व्यवसायाचे बस्तान मौदा तालुक्यातील अरोली गावात मांडले असून तेथून अवैध तंबाकू विक्री व्यवसाय होत असल्याची गुप्त माहिती आहे तेव्हा याकडे पोलीस विभागाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.