पोलीस स्टेशन उमरेड :- अंतर्गत सानेझरी झोडे ले आउट उमरेड ०३ किमी पश्चिम यातील फिर्यादी यांचे राहते घराचे कोनीतरी अज्ञात चोराने कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन लोंखडी कपाटातील ठेवलेले नगदी २०. ०००/- व त्याचे पत्नीचे सोन्याचे दागीने १) एक सोन्याची नाकातील नथ ०३ ग्रॅम कि ६,०००/- रु२) एक सोन्याची ०५ ग्रॅम अंगठी कि . १०,०००/रु३) एक सोन्याचा गोफ १२ ग्रॅम कि २०,०००/- रु ४) एक गळ्यातील सोन्याने मनी आलेली ०४ ग्रॅमची गरसोली कि. ८,०००/- असा एकुन ६४,०००/- रु चा मुददेमाल चोरी करून नेला.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे- अंकुश गोमा कुहीकर वय ४० वर्ष रा सोनहारी झोडे ले आउट उमरेड यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे अनोळखी आरोपीविरूध्द कलम ४५४,३८० भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि दिनेश खोटेल पोस्टे उमरेड हे करीत आहे.