कोल्हापूरनंतर आता इचलकरंजीत तणाव, कोल्हापूर प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, इंटरनेट बंदच

कोल्हापूर :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात मंगळवारी दोन गटात वाद झाला. संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यानंतर घरी परतत असताना संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. यामुळे बुधवारी कोल्हापुरात तणाव होता. आता गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत तणाव निर्माण झाला आहे.

कशामुळे इचलकरंजीत तणाव, दोन जण ताब्यात

इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी गावातील मतदार गल्लीमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी आपल्या मोबाईलवर औरंगजेब अन् टिपू सुलतानचे आक्षेपार्य स्टेटस ठेवले होते. ही माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळतात त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना चांगला चोप दिला. दरम्यान, शहापूर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गावमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कोणता अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे. तसेच खोतवाडी गावामध्ये चौका चौकामध्ये पोलीस तैनात आहे.

इचलकरंजी येथील कबनूर गावातील हनुमान मंदिराशेजारी अज्ञात व्यक्तीने मजकूर लिहिल्याने तणाव निर्माण जाला आहे. तर कोल्हापूरच्या खोतवाडी गावातही स्टेट्सवरून तणाव निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमरनाथ के लिए लंगर सामग्री 15 को होगी रवाना

Thu Jun 8 , 2023
नागपुर :- प्रतिवर्ष की तरह ही इस वर्ष भी श्री टेकड़ी रोड हनुमान मंदिर , गवलीपुरा, सीताबर्डी की ओर से अमरनाथ के लिए लंगर सामग्री का ट्रक 15 जून को रवाना किया जाएगा। लंगर सामग्री में सभी प्रकार की जीवन आवश्यक वस्तुओं को भक्तों के लिए भेजा जाएगा। यह लंगर सामग्री श्री शिव शक्ति सेवा मंडल को दी जाएगी। मंदिर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights