नागपुर :- सुरळीत वीजपुरवठयासोबतच लाखो भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेली महावितरण वीजयंत्रणा निर्धोक ठेवण्यासाठी यापूर्वीच देखभाल व दुरुस्तीच्या उपाययोजना केलेल्या आहेत.प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये महावितरण अभियंते, “कर्मचाऱ्यांनी तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारीच कार्यकत्यांनी वीज सुरक्षेबाबत सतर्क व सजग राहावे, तसेच सर्व नागरिकांनी देखील वीजयंत्रणेपासून योग्य सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
ओडिशामध्ये गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकीत बुलढाण्याच्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या घटनेचे गांभीर्य बघता महावितरणतर्फे गुरुवारी (दि. 28) होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत विजेच्या धक्क्यापासून सावध रहात सुरक्षित मिरवणूक काढण्याचे आवाहन केले आहे. तसेच मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.राज्यातील सर्वाधिक उत्साहाच्या व आनंदाच्या गणेशोत्सवामध्ये मंडळांनी उभारलेले देखावे, विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.
या उत्सवात सुरळीत वीजपुरवठा व बीज सुरक्षेसाठी महावितरण नागपूर परिमंडल अंतर्गत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागपूर परिमंडलात अभियंते,तांत्रिक कर्मचारी तसेच दुरुस्ती कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांचे कर्मचारी आवश्यक साहित्य व साधन सामग्रीसह वीज ग्राहकांना सेवा देत आहेत.गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीमध्ये वीजसुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
या ठिकाणी गणेशोत्सवापूर्वी वीजयंत्रणेची पाहणी करून देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी किंवा मिरवणुकीच्या मार्गावर नागरिक किंवा लहान मुले फिडर पिलरवर चढू नयेत यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये शॉर्टकट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी तसेच तातडीच्या मदतीची गरज भासल्यास 1912 किंवा 18002123435 किंवा 18002333435हा टोल उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिदर राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात फ्री क्रमांक उपलब्ध राहणार आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत भाविक मंडळी सुरक्षित अंतरावर राहतील यासाठी आवश्यक साधन सामग्री सह महावितरणचे कर्मचारी त्या त्या ठिकाणी देखरया अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध करणार आहे. शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील विसर्जन मिरवणुकीसाठी महत्वाच्या ठिकाणी अभियंते व कर्मचान्यांची विशेष नियुक्ती करण्यात येणार आहे. महावितरणच्या अपघातमुक्त गणेश विसर्जनाला गणेश भक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन,महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर