पो.स्टे. मौदा :- अंतर्गत ०.५ कि.मी. अंतरावरील मौदा येथे दिनांक ३१/०५/२०२३ मे १०.०० वा. ते दिनांक ०१/०६/२०२३ ०.०३ वा. दरम्यान फिर्यादी नामे राजु चुडामन नाकाडे, रा. मौदा याचे घरी आत प्रवेश करून फिर्यादीचे १० ग्रॅम सोन्याची पोत किंमती अंदाजे ३०,०००/- रु. ०२ ग्रॅमचे ०२ अंगठी किमती अंदाजे २५००/-रु.०१ ग्रॅम सोन्याची मनगटी २५००/- रु. पायातील चांदीचे किंमती अंदाजे ५००/- रु व नगदी १७,०००/- असा एकुण ५२,५००/- रुपयाचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला आहे.. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ४५७, ३८०, ३४ भादवि.
कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी पोलीस स्टेशन मौदा हे करीत आहेत.