मौदा :- अंतर्गत २० किमी अंतरावर मौजा सुंदरगाव शिवार मौदा येथे दिनांक २६/०५/२०२३ २०/१५ वा. ते २१/१० वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ यांना गोपनीय माहीती मिळाली की, काही इसम आपले विना नंबरच्या ट्रॅक्टर ट्रॉली च्या साहाय्याने विनापरवाना व अवैदयरीत्या रेतीची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ यांनी मौजा सुंदरगाव शिवार मौदा येथे नाकाबंदी केली असता, घटनास्थळावर विना नंबरचा ट्रॅक्टर ट्रॉली ही येतांना दिसली. ट्रॅक्टर ट्रॉली च्या चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात चालक नामे- 1) देविलाल बारकु सहारे, वय ४० वर्ष, रा. महादुला व मालक २) बिहरी वातु थोटे, रा. इजनी ता. मौदा है रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीतांच्या ताब्यातून विना नंबरचा शेंदरी रंगाचा ट्रॅक्टर किमती अंदाजे ७,००,०००/- रु. विना क्रमांकाची शेंदरी रंगाची ट्रॉली किमती अंदाजे १,५०,०००/- रु. व एक ब्रास रेती किंमती अंदाजे ४००० /- रु असा एकूण वाहनासह ८,५४,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी सरकारतर्फे पोलीस नायक दिपक दरोडे व नं. ८४३ पोस्टे मौदा यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीताविरुध्द कलम ३७९, १०९ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनेकर हे करीत आहे.
अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com