अंमली पदार्थांचा मोठा साठा एमआयडीसी तळोजा येथे नष्ट करण्यात आला

मुंबई :- महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक आयुक्तालय यांनी जप्त केलेला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचा (NDPS) साठा आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, तळोजा येथे नष्ट केला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार, मुंबई सीमाशुल्क विभाग- III अंतर्गत, प्रतिबंधात्मक आयुक्तालयाच्या उच्च स्तरीय अंमली पदार्थ निर्मूलन समितीच्या उपस्थितीत हे अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत नष्ट करण्यात आलेल्या कोकेन, हेरॉइन, मेथॅम्फेटामाइन, मारिजुआना (गांजा), मँड्राक्स गोळ्या आणि एमडीएमए या अंमली पदार्थांची एकूण किंमत जवळजवळ 1500 कोटी रुपये होती, अशी माहिती सीमा शुल्क (प्रतिबंधात्मक) विभागाच्या प्रधान आयुक्तांनी दिली.

नष्ट करण्यात आलेले अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ पुढील प्रमाणे:

S.No         Description            Quantity

1               Cocaine                    9.035 Kg

2               Heroin                      16.633 Kg

3         Methamphetamine      198.1 Kg

4             Marijuana (Ganja)    32.915 Kg

5              Mandrax Tablet        81.91 Kg

6.                MDMA                 298Tablets       (134 Gms)

अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया मेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि., प्लॉट नं.32, एमआयडीसी, तळोजा, पनवेल, येथे करण्यात आली.

NewsToday24x7

Next Post

चित्ता स्थानांतरणाची प्रगती आणि देखरेख तसेच मध्य प्रदेश वन विभाग आणि राष्‍ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांना सल्ला देण्यासाठी चित्ता प्रकल्प सुकाणू समितीची स्थापना

Fri May 26 , 2023
मुंबई :- राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने चित्ता प्रकल्प सुकाणू समिती स्थापन केली आहे.मध्य प्रदेश सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांबरोबर आणि वन विभागाच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भातला निर्णय झाला होता. या सुकाणू समितीचे अध्‍यक्षपद नवी दिल्लीच्या ग्लोबल टायगर फोरमचे सरचिटणीस डॉ. राजेश गोपाल यांच्‍याकडे सोपवण्‍यात आले आहे. देशभरातील विविध ठिकाणचे वन्य जीव अभ्‍यासक, तसेच वन्‍य प्राणी विभागाचे अधिकारी म्हणून कार्यरत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com