मौदा :- अंतर्गत २० किमी अंतरावर मौजा सुंदरगाव शिवार मौदा येथे दिनांक २६/०५/२०२३ २०/१५ वा. ते २१/१० वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ यांना गोपनीय माहीती मिळाली की, काही इसम आपले विना नंबरच्या ट्रॅक्टर ट्रॉली च्या साहाय्याने विनापरवाना व अवैदयरीत्या रेतीची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ यांनी मौजा सुंदरगाव शिवार मौदा येथे नाकाबंदी केली असता, घटनास्थळावर विना नंबरचा ट्रॅक्टर ट्रॉली ही येतांना दिसली. ट्रॅक्टर ट्रॉली च्या चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात चालक नामे- 1) देविलाल बारकु सहारे, वय ४० वर्ष, रा. महादुला व मालक २) बिहरी वातु थोटे, रा. इजनी ता. मौदा है रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीतांच्या ताब्यातून विना नंबरचा शेंदरी रंगाचा ट्रॅक्टर किमती अंदाजे ७,००,०००/- रु. विना क्रमांकाची शेंदरी रंगाची ट्रॉली किमती अंदाजे १,५०,०००/- रु. व एक ब्रास रेती किंमती अंदाजे ४००० /- रु असा एकूण वाहनासह ८,५४,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी सरकारतर्फे पोलीस नायक दिपक दरोडे व नं. ८४३ पोस्टे मौदा यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीताविरुध्द कलम ३७९, १०९ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनेकर हे करीत आहे.
Next Post
शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Sun May 28 , 2023
मौदा :-पो. स्टे. मौदा फिर्यादी मागे आशा राजेश पैन, वय २५ वर्ष, ए. आजाद चौकातला हिचा आरोपी पती नामे- राजेश श्रावन वैदय, वय ३५ वर्ष, रा. आझाद चौक धानला हा दारु पिण्याच्या सवईचा असून यातील फिर्यादीला नेहमी दारू पिवून मारतो काही दिवसा पूर्वी यातील फिर्यादीला आरोपीने तिच्या वडीलांकडुन ४०,०००/- मागीतले व त्यांनी दिले त्यानंतर फिर्यादीने मुलीसाठी १० ची सोन्याची चैन […]

You May Like
-
October 14, 2022
कोळसा खदान जि प शाळे जवळुन दगडी कोळसा व मारूती सुजुकी चोरी.
-
January 9, 2022
केन्द्र सरकार का देश के मजदूरों के लिए काम करने का मनोदशा नहीं
-
February 22, 2023
PM urges all to take part in Best Tourism Village Competition
-
June 3, 2023
वाहतूक नियमांचे पालन करणा-यांना ‘ट्रॅफिक रिवॉर्ड्स’
-
October 9, 2023
चार दिवस तरुणाईचा होणार जल्लोष…..