अवैध्यरीत्या मोहाफूल गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

सावनेर :- दिनांक ०४/०३/२०२४ चे २०/०० वा. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बिहाडा फाटा चेक पोस्ट येथे जाऊन नाकाबंदी करत असता सदर आरोपी नामे- मोरेश्वर शेषराव गुरडकर, वय ३२ वर्ष, रा. जोगा ता. सावनेर, जि. नागपुर हा आपल्या ताब्यातील इलेक्ट्रिक मोटरसायकल क्र. MH-40 CL-8723 किंमती ५०,०००/- रू. येताना दिसल्याने त्याला थांबवुन दारूबाबत झडती घेतली असता गाडीवर २ प्लास्टिक कॅनमध्ये ३० लिटर मोहाफुल गावठी दारू किंमती १५००/- रु. चा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपीकडुन १) मोहाफुल गावठी दारू १५ लिटर प्रत्येकी ५०/- रुपये लिटर प्रमाणे एकूण किंमती १५००/- रु २) इलेक्ट्रिक मोपेड गाडी क्र. MH -40 / CL-8723 किंमती ५०,०००/- रु एकुण किंमती ५१,५००/-रू. नवा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार संदिप नागरे हे करीत आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे),अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे केळवद येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर, सहायक फौजदार संदीप नागरे, पोलीस हवालदार मंगेश धारपुरे, पोलीस अंमलदार बोडुतात्या देवकते, महिला पोलीस हवालदार किरण भगत यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामीण भागातील महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध महत्वकांक्षी योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा - अनिल निधान  

Wed Mar 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामीण भागातील महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध महत्वकांक्षी योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान यांनी भारतीय जनता पार्टीचे वतीने राम मंदिर सभागृहात आयोजित नारीशक्ती वंदन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले नारी शक्ती वंदन कार्यक्रमाची सुरुवात नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान यांचे हस्ते दीप प्रज्वलन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com