नागपूर :- सायबर पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे दि.१८/०३/२०२३ रोजी फिर्यादी प्रिया दिगांबर गोंडाणे, वय ३४ वर्षे, व्यवसाय – हाऊसिंग फायनान्स, रा. गौतमनगर, मेकोसाबाग, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारी वरुन अपराध क १७/२०२३ कलम ४०६, ४१९,४२० भा.द.वि सह ६६ (सी) ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ सहकलम फॉरेनर अॅक्ट १९४६ कलम १४ दाखल झाला आहे.
सदर गुन्हयामध्ये Collins Jerry या फेसबुक आयडी धारकाने फिर्यादीशी फेसबुक या सोशल मिडीयावर ऑनलाईन मैत्री करुन वॉटसअप चॅट करुन फिर्यादीचा विश्वास संपादन करुन महागडे गिफ्ट तसेच ५० हजार पौंड इतके विदेशी चलन (भारतीय चलनात अंदाजे ५० लाख रुपये) पाठविण्याचे आमिष दाखवले व दुस-या मोबाईल क्रमांकावरुन वॉटसअप कॉल करुन ते कस्टम विभागाचे अधिकारी बोलत आहे असे भासवुन सदर गिफट सोडवुन घेण्याकरीता लागणा-या विविध चार्जेसच्या नावाखाली २,२४,०००/- रुपये इतकी रक्कम देण्यास भाग पाडुन फसवणुक केली..
सदरचा गुन्हा हा क्लिष्ट व तांत्रिक स्वरुपाचा असून आरोपीच्या व फिर्यादीच्या बँक खात्याला संलग्न असलेल्या मोबाईलच्या तपशिलाचे व बँक खात्याचे विश्लेषण केले असता सदर व्यवहार हा दिल्ली येथुन झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप आयुक्त, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली आरोपीताची माहिती प्राप्त करून सपोनि संदीप बागुल, सपोनि विजय भिसे, पोशि/ ५७४ अजय, पोशि/ १७२३९ योगेश असे तपास पथक दिल्ली करीता पाठवुन आरोपीचा वेगवेगळया ठिकाणी शोध घेवुन सापळा रचुन आरोपी नामे Emeka Paulinus Udenze वय ४३ वर्षे, रा. फेज ३, ओम विहार, उत्तमनगर, दिल्ली (मुळ नायजेरियन) यास चौकशी करीता ताब्यात घेवुन नागपूर येथे आणले असता आरोपी हा नायजेरीयन असुन त्याचे पासपोर्टची मुदत सन २०१८ साली संपलेली असल्याचे व त्यानेच सदर अपराध केल्याचे निदर्शनास आल्याने त्यास दि.२१/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीचा दिनांक २७/०५/२०२३ रोजी पावेतो पीसीआर प्राप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.