संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आजच्या स्पर्धात्मक धकाधकीच्या जीवनात पैसे कमविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे त्यात पैसा कमविण्याच्या नादात कित्येकांनी माणुसकीसुदधा विसरल्याचे उदाहरण दृष्टिक्षेपास आहेत मात्र प्रामाणिकता आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे ज्यांचे प्रचितीक उदाहरण आज नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे दिसून आले.तीन सीटर ऑटो मध्ये प्रवास करीत असलेल्या एका महिलेचे ऑटो मध्ये विसरलेले 30 हजार रुपये किमतीचे दागिन्यांने भरलेली बॅग ऑटो चालकाने कामठी पोलीस स्टेशन ला आणून प्रवासी महिलेला परत करीत माणुसकीचा परिचय दिल्याची घटना आज दुपारी 12 दरम्यान घडली असून माणुसकीचा परिचय देणाऱ्या या ऑटो चालकाचे नाव मो शाबीर अन्सारी असे आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला प्रवासी नामे मेघा धनराज उडगिरवर वय 38 वर्षे रा रामटेक ह्या ऑटो चालक नामे मो शाबीर अन्सारी यांच्या ऑटो मध्ये प्रवास करून परत जात असता या प्रवासी महिलेचे कपडे व दागिनेने भरलेली बॅग ऑटो मध्येच विसरली असल्याची बाब ऑटो चालकाच्या लक्षात येताच ऑटोचालकाने त्वरित नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून हरविलेले दागिने व कपडे ने भरलेली बॅग पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे यांच्याकडे जमा करून घटनेची माहिती दिली.यावर पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे यांनी सदर घटनेतील महिलेला पोलिस स्टेशन ला बोलावून हरविलेले दागिने परत केले.यावर सदर महिलेने या ऑटोचालक तसेच पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.तर पोलिसांनी माणुसकी अजूनही जिवंत आहे यांचे प्रात्यक्षिक अनुभव घेत पोलीस विभागातर्फे पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे यांनी ऑटो चालक मो शाबीर अन्सारी यांचे कौतुक करीत प्रमाणिकतेचा सत्कार केला.