भारतीय जनता पक्षाच्या किचन कीट वाटप कार्यक्रमात झाली चेंग्रा चेंगरी

– एका महिलेचा दुर्दैवी मृत्यु,शिबिर रद्द करण्याची नामुष्की आली

नागपुर :- दिनांक 09/03/2024 ला कोतवाली पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांना राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महासचिव व नागपूर मा. न.पा. चे नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष नागपूर महानगर पदाधिकारी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर कलम 302 चा गुन्हा दाखल करण्या बाबत निवेदन देण्यात आले.

कारण भारतीय जनता पक्ष नागपूर महानगर पदाधिकारी व प्रामुख्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत इमारत बांधकाम कामगार /घरेलू कामगार नोंदणी, नूतनीकरण, किचन किट वाटपाचे भव्य शिबिर दिनांक 8, 9, 10, 11, मार्च 2024 सकाळी 10 ते 4 सुरेश भट सभागृह रेशीम बाग येथे आयोजित करण्यात आले आहे.

परंतु शिबिराच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 9/03/2024 ला हजारोच्या संख्येने इमारत बांधकाम कामगार , घरेलु कामगार महिला नोंदणी , नूतनीकरण, आणि किचन कीट मिळवण्या करीता सुरेश भट सभागृह येथे आल्या होत्या. आणि फार मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी सुरेश भट सभागृह परिसरात झाली. कालांतराने सकाळी 11 ला गर्दी हाताळन्या पलीकडे होऊन चेंग्रा चेंग्रीत झाली. आणि या चेंग्रा चेंग्रित मनुबाई राजपूत ,आशीर्वाद नगर नामक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी 5 वाजता पासन महिलांची गर्दी जमली होती. दुपारी 12 पर्यंत सभागृहाचे गेट उघडण्यात आले नव्हते तपत्या उन्हात महीला तासन् तास उभ्या होत्या त्यांच्या सध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण करण्यात आली नव्हती. सुरेश भट सभागृह हे वातानुकूलित आहे परंतु भारतीय जनता पक्षाने किट वाटप चा शिबिर तळ मजल्यावर उन्हात घेण्यात आला होता. चेंग्रा चेंग्री नंतर चपलांचा व भुटलेल्या बांगड्यांचा सडा सर्वत्र पडला होता. हृदय विदारक घटने नंतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आणि भारतीय जनता पक्षाचे बडे नेते , पदाधिकारी पसार झाले. आणि किचन किट वाटप शिबिर रद्द करण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षा वर आली.

आणि या निरपराध महिलेच्या दुर्दैवी मृत करीता सर्वस्वी भारतीय जनता पक्ष नागपूर महानगर पदाधिकारी व प्रामुख्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निष्लाजी पणा आणि अपूर्ण व्यवस्थापन जबाबदार आहे. आणि नागपुर , महाराष्ट्राच्या जनतेच्या कराच्या पैष्याने स्वतःची ब्रॅण्डिंग करतात . व संपूर्ण नागपुर भर चौका चौकात बॅनर लावतात. आणि भाजप च्या निष्काळजी व्यवस्थापनाचा ठपका अपुऱ्या पोलीस प्रशासना वर टाकतात म्हणून आपण याची सखोल चौकशी करून दोषींवर 302 चा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

पोलिस स्टेशन घेराव दरमियान स्वप्नील बावनकर,स्वप्नील ढोके,राहुल खैरकर, कुणाल खडगी,सागर चव्हाण, नयन तरवटकर, मोइज शेख, राजू अन्सारी, अयात खान, रोहन मासुरकर, बाबू खान,अमन लुटे तसेच नागपूरकर उपस्तिथ होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पद्मश्री पुरस्कार हा निःस्वार्थ सेवेची पावती - नितीन गडकरी

Sun Mar 10 , 2024
– डॅा. चंद्रशेखर मेश्राम, डॅा. संदीप चौधरी यांच्या सेवाकार्याचा गौरव नागपूर :- निःस्वार्थ व समर्पित भावनेने गोगरिब रुग्णांची सेवा करताना सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य डॅा. चंद्रशेखर मेश्राम, डॅा. संजीव चौधरी तसेच समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी केले आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देताना हे कार्य यापुढेही कायम सुरू राहील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com