अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध गुन्हा नोंद

– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई

नागपूर :- दिनांक २२/०३/२०२४ रोजी सकाळी ०६.४५ वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पोलीस स्टेशन हद्दीत स्टाफसह अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना चिरव्हा शिवारात चिरव्हा ते वाढना रोडने विना क्रमांकाचा आयशर ट्रॅक्टर ट्रॉलीसह येताना दिसल्याने चिरव्हा शिवारात नाकाबंदी दरम्यान ट्रॅक्टरला थांबवून पाहणी केली असता विना क्रमांकाचा आयशर ट्रॅक्टर मध्ये अंदाजे १ ब्रास रेती मिळून आल्याने सदर ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने विना क्रमांकाचा आयशर ट्रॅक्टर किंमती ५,००,०००/- रू. व त्यामधील १ ब्रास रेती किंमती ४,०००/- रू. असा एकूण ५,०४,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक नामे – इंद्रपाल उर्फ पिंटू बकाराम मुलुंडे, वय ३१ वर्ष, रा. महादुला तसेच ट्रॅक्टर मालक गणेश आत्माराम कडव, वय ३६ वर्ष यांचेविरुद्ध अप. क्र. ३३६/२४ कलम ३७९, १०९ भा. द. वी. सहकलम ४८(७), ४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४, २१, खाणी आणि खनिजे अधी. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. मौदा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मौदा येथील ठाणेदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिशसिंग राजपूत, पोलीस हवालदार भगवान चांदेवार, राजू आंधळे, गणेश मुदमाळी, पोलीस नाईक श्रीराम डोईफोडे, अजय वाघमारे, रोशन पाटील यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कमी मतदान टक्केवारीच्या मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून स्वीपद्वारे मतदान वाढीसाठी प्रयत्न करावेत- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

Tue Mar 26 , 2024
पुणे :- कमी मतदान असलेला जिल्हा किंवा मतदार संघस्तरावर स्वीप कार्यक्रम मर्यादित न ठेवता कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचून तेथील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. यशदा येथे आयोजित स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights