भंडारा :- पशुसंवर्धन विभाग पंचायत समिति भंडारा तर्फे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी व पशुपालक मेळाव्याचे आयोजन उद्या विठ्ठल रुक्माई मंदिर जवळ कोरंभी रोड गणेशपुर येथे सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या मेळाव्यात पशुपालना विषयी तज्ञाद्वारे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील उत्कृष्ट जनावरांना गट निहाय बक्षिष देण्यात येणार आहे. मेळाव्याला जास्तीत जास्त पशुपालकानी स्वतः च्या उत्कृष्ट पशु-पक्ष्यासह उपस्थित राहावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग पंचायत समिति भंडारा तर्फे करण्यात आले आहे.