भारत आणि युरोपीय देशांत व्यापारासोबतच प्रेम आणि स्नेह देखील घट्ट व्हावा “युरोपियन डे” समारंभात व्यक्त केली अपेक्षा

“ग्लोबल वॉर्मिंग” विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचे आवाहन

मुंबई :- भारत आणि युरोपीय देशातील संस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेहदेखील घट्ट व्हावा अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 

“द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडिया” च्या वतीने मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित “युरोपियन डे” समारंभात ते बोलत होते. मंचावर मध्य प्रदेशचे सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग तथा विज्ञान व तंत्र विज्ञान मंत्री श्री ओमप्रकाश सकलेचा, स्वीडन च्या कौन्सिल जनरल अँना लेकवॉल, द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडियाच्या डायरेक्टर डॉ. रेणू शोम,अध्यक्ष पियुष कौशिक, उपाध्यक्ष राजीव शर्मा उपस्थित होते.

यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भारत आणि युरोपीय देशांचे संबंध व्यापारिक आणि आर्थिक क्षेत्रात अधिक दृढ व्हायला हवे; विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वात भारत जागतिक स्तरावर प्रगती करीत आहे. “वसुधैव कुटुंबकम” ही भावना आणि हे विचार जगात पोहोचावे यासाठी मोदीनी पुढाकार घेतला आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान च्या पुढे “जय अनुसंधान” चा नारा देत नवीनतम आणि संशोधन (इनोवेशन आणि इन्वेन्शन) याकडे आता भारत लक्ष देत आहे. आपणही यासाठी पुढे यावे; फक्त संशोधन करताना नव्या समस्या निर्माण होवू नयेत याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

जागतिक पर्यावरण बदलाचा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत असून पर्यावरण व वन संरक्षण ही आपण आपली जबाबदारी समजून “ग्लोबल वॉर्मिंग” नावाच्या दानवाचा संहार करु अशी भावना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन उपस्थितांना करुन ना. मुनगंटीवार म्हणाले महाराष्ट्र स्वागताला तयार आहे, तुम्ही विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पुढे या. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व देशांच्या अधिकाऱ्यांना व उद्योगपतींना ताडोबा व्याघ्र सफारीला येण्याचे निमंत्रण देखील दिले.

मध्य प्रदेश चे मंत्री ओमप्रकाश सकलेचा यांनी भारत आणि युरोपीय देशांनी आपल्या गरजा ओळखून शैक्षणिक, औद्योगिक आणि विशेष करुन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देवाण घेवाण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मांगल्य संस्थाने मिटाई बेजुबानो जनावरोंकी की प्यास।

Sun Jun 4 , 2023
नागपूर :- गर्मी के मौसम मे इंसान की ही हालत पाणी के बगैर कितनी मुश्किल होजती है तो रlस्ते के बेजुबान पशू ,पक्षी प्रनियोंकी हालत पाणी के बिना क्या होगी..कई पशू पक्षी तो केवल गर्मी ओर प्यास के चलते अपना दम तोड हे देते हैं.. भीषण गर्मी मे सभी जलत्रोत्र सुख जाते हैं ओर पाणी की कमी हर जगह मेहसुस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com