नागपूर :- दिनांक ०३.०४.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केसेसमध्ये २७ ईसमावर कारवाई करून रू. २४,२८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण ०४ ईसमावर कारवाई करून रु. १४.६९५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २.७६९ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. २,३२,७५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.