महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
नागपूर :- महा मेट्रोने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत अनेक उपाय योजना केल्या असून ज्यामध्ये मेट्रो स्थानकांवर ई- बाईक, ई – रिक्षा, इलेक्ट्रिक वाहनांन करिता चार्जिंग पॉईंट,फिडर बसची व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मेट्रोचा प्रवास होताच मेट्रो स्थानकावरून आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत अन्य साधनांचा उपयोग प्रवासी करत असतात ज्यामध्ये खापरी मेट्रो स्टेशन येथून एम्स हॉस्पिटल, मिहान सेझ इत्यादी ठिकाणी ई- रिक्षा आणि नागपूर महानगर पालिकेच्या आपली बस द्वारे वापर करीत आहे.
मुख्य म्हणजे मेट्रो स्थानकावर नागरिक, शाळा व कॉलेज येथील मुले प्रतिदिन मेट्रो ने प्रवास करीत आहे व मेट्रोचा प्रवास पूर्ण झाल्यावर मेट्रो स्टेशन येथून अन्य उपलब्ध साधनांचा उपयोग करीत आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून सकाळी ६.०० वाजता पासून ते रात्री १०.०० वाजता पर्यंत मेट्रो सेवा सुरु आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट असून जे दररोज सायकल ने प्रवास करून कॉलेज, ऑफिस तसेच इतर ठिकाणी ये जा करतात. सायकल मेट्रो सोबत सायकलचा प्रवास करने आता सोईस्कर झाले आहे. मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरत आहे.
महा मेट्रोने मेसर्स ईटीओ मोटर्सच्या वतीने सुमारे ९० ई- रिक्षा प्रवाश्यान करता उपलब्ध केले आहे.
• ऑरेंज लाईन मार्गिका (खापरी मेट्रो स्टेशन ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन) :४४
• ऍक्वा लाईन मार्गिका (लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन) :२०
• डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान :०२ + ०२
या व्यतिरिक्त ४० ई- स्कुटरची देखील व्यवस्था मेट्रो स्टेशन येथे आली आहे. सदर सेवा ही ऍप बेस असून आपण मोबाइल ऍप साह्याने याचा उपयोग करू शकतात.
मनपाच्या फिडर बस सेवा देखील मेट्रो स्थानकांवर उपलब्ध :
खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा व जवळपासच्या परिसरात जाण्याकरिता फिडर सर्विसच्या रूपात आपली बस सेवा सुरु असून प्रवाश्याना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. बुटीबोरी आणि हिंगणा या ठिकाणी शहरातून दररोज हजारो प्रवासी ये जा करतात. खाली दिलेल्या आकडेवारी प्रमाणे प्रतिदिवस आपली बसच्या फेऱ्या मेट्रो प्रवाश्यान करता उपलब्ध असतात.
• बंसी नगर मेट्रो स्टेशन ते ईसासनी दरम्यान : ४४
• खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी एम आय डी सी -एम्स -ब्लूमडेल-एमआरओ पर्यंत : २५
• खापरी मेट्रो स्टेशन ते एम्स हॉस्पिटल : ३२
• खापरी मेट्रो स्टेशन ते टेक महिंद्रा (मिहान सेझ) : : ०८
• जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते जयताळा : २६
• जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते बेसा-म्हाळगी नगर : २०
• जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते बेलतरोडी : २८