भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश तर्फे महाराष्ट्रातील सर्व बहुजनांना संघटित करण्याच्या उद्देशाने दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्रिमूर्ती चौक इथून बाईक रॅलीचे आयोजन करण्याचा आले होते. ही बाईक रॅली महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातून ७२ विधानसभा क्षेत्रामध्ये २५०० किमी प्रवास करणार आहे.
सदर रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर व भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, गोंदिया जिल्हाध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी या बाईक रॅली प्रवासा दरम्यान गांधी चौक येथील कॉर्नर सभेच्या वेळीस सभेला संबोधले. यात ओबीसी की बात करेंगा वही राज करेंगा अश्या घोषणा दिल्या. राज्य अध्यक्ष रायपूरकर यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या वर कडाडून टीका केली. याप्रसंगी शरद पवार यांनी निवडणूकीत जिंकू न शकणार्या प्रफुल्ल पटेल यांना चार वेळेस राज्यसभावर पाठविले. त्यांनी शरद पवार यांच्या शी गद्दारी केली असून त्यांना नागरिकांनी धडा शिकवायला हवा असे आवाहन देखील भंडारावासी यांना करण्यात आले.
राकाँ पक्ष प्रमुख शरदचंद्र पवार यांनी बहुजनांना दिलेला योगदान पाहता त्याचे फलित बहुजनांपर्यंत पोहचविण्याचे कार्य या रॅलीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बहुजनांनी ५० वर्षाच्या कारकिर्दीत जे योगदान दिले त्याचे सार्थक म्हणून बहुजन जुडेगा, देश बढेगा हा नारा घेऊन महाराष्ट्रातील सर्व जनतेला आवाहन करीत पवार साहेबांच्या झेंड्याखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलची निर्मिती करण्यात आली आहे. पवार साहेबांनी आपल्या कारकिर्दीत अनेकांना नेते बनविले, आमदार, खासदार बनविले परंतु आज तेच स्वत:च्या स्वार्थापोटी आपले कर्तव्य विसरुन गेलेत. असे मार्गदर्शन पर भाषणात जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी माहिती सांगितली.
सदर रॅलीमध्ये महिला आरक्षण, मराठी विद्यापीठातील आरक्षण, अल्पसंख्यांकासाठी निर्णय, महाराष्ट्रातील प्रत्येक घटकासाठी अमुल्य अशी बहुजनांमध्ये जागृती करण्यात आली आहे. या बाईक रॅली मध्ये जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, महासचिव दिलीप सोनूले, विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, ओबीसी सेल अध्यक्ष नितेश मारवाडे, मधुकर चौधरी शहर अध्यक्ष,यशवंत भोपे जिल्हा उपाध्यक्ष, सुखराम अतकरी सहकार सेल जिल्हा अध्यक्ष, राजा खॉन सचिव, श्याम कळंबे मोहाडी तालुका अध्यक्ष, ईश्वर कळंबे भंडारा तालुका अध्यक्ष, राकेश श्यामकुवर जिल्हा मिडिया प्रमुख, नितीन तलमले उपाध्यक्ष विधानसभा, गणेश ठवकर किसान अध्यक्ष मोहाडी तालुका, प्रफुल्ल मेश्राम युवा अध्यक्ष लाखनी,जितेंद्र श्यामकुवर लाखनी तालुका युवक उपाध्यक्ष, भाऊदास धुर्वे, सत्वधिर दहीवले, रुपचंद लिंगायत, विलास झोडापे, विजय नवखरे लाखनी ओबीसी अध्यक्ष, यशवंत भोयर, बुध्दे, गजभिये शहापूर, अजय सेलोकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.