ख-या च्या वादातुन युवकावर चाकुने हल्ला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच किमी अंतरावर असलेल्या खंडाळा (घटाटे) गावात ख-या च्या वादातुन युवकावर चाकुने हल्ला करुन जख्मी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहिती नुसार खंडाळा (घटाटे) गावात मंगेश गोपीचंद खंगार वय २९ वर्ष रा. खंडाळा हा घरी च पानठेला चालवुन खर्रे विक्री करित असुन राजेंद्र पुसाराम मनघटे वय ३७ वर्ष रा. खंडाळा याचे कडे उधारीचे पैसे होते. मंगेश ने राजेंद्र ला म्हटले कि, तु ख-याचे उधार असलेले पैसे मला दे. राजेंद्र याने त्याला म्हटले कि, मोबाईल सोबत आणलेला नाही, त्यांच्यात फोन पे मारुन देईल असे म्हटले होते. मंगळवार (दि.१ ) ऑगस्ट ला सकाळी ८ वाजता दरम्यान राजेंद्र मनघटे हा मंगेश खंगार यांचे घरी खर्रा घेण्याकरिता गेला असता मंगेश ने म्हटले कि, तुझ्याकडे ख-याचे उधारी चे २० रुपये आहेत असे म्हटले असतांनी राजेंद्र यांनी घेतलेला खर्रा परत केला. त्या नंतर मंगेश आणि राजेंद्र यांचात वाद झाला. रागाचे भरात राजेंद्र याने मंगेश ला मारहान केली. त्यानंतर राजेंद्र घरी रस्त्यांनी जात असतांना मंगेश याने भाजी कापण्याचा चाकु घेवुन आला व त्याने राजेंद्र यांचा उजव्या हाताचे तळ हातावर मारुन गंभीर जख्मी केले. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी राजेंद्र मनघटे यांचे तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी मंगेश खंगार चे विरुद्ध अप क्र ४९१/२३ कलम ३२४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

NewsToday24x7

Next Post

३३ केव्ही ची ३२ स्पॅन ची सत्तर हजार रूपयांची विजेचे तार चोरी

Wed Aug 2 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा शिवार टोल प्लाॅजा चे मागुन असलेले मनसर फिडर ने नविन गोंडे गावला विधृत पुरवठा देणारी ३३ केव्ही ची ३२ स्पँन विजेची तार किंमत सत्तर हजार रूपयाची कोणीतरी अज्ञात टोळीच्या चोरट्यांने चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी अभियंता सागर वाघमारे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com