संदीप कांबळे – विशेष प्रतिनिधी
कन्हान- माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कन्हान नदी वरच्या पुलाची पाहणी करुण लवकरात लवकर कश्या प्रकार उद्घघाटन होईल अशा आशयाचे निवेदन रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा ग्रामीण यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
निवेदना मधे सांगण्यात आले की पुलाच काम पुर्ण झाले असून त्याची आपन एकदा पाहणी करुण आपल्या स्तरावर आपल्या पद्धति ने लवकरात लवकर उदघाटन कस होईल आणि आम जनतेला येन्या जान्या करीता लवकरात लवकर उपलब्ध होईल या बद्दल विनंती करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर ग्रामीण, जयराम मेहरकुळे जिल्हा मंत्री भाजपा, राजेंद्र शेन्द्रे गट नेते कन्हान नगर परिषद, शैलेश शेळके तालुका संपर्क प्रमुख भाजपा, राजेश ठवरे, विशाल मुंजेवार, दामोधर चुलबुले उपस्थित होते.