संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 26 :- काँग्रेस च्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना ईडी ची नोटीस बजावल्याने या नोटीस च्या विरोधात आज सकाळी 11 वाजता गांधी भवन कामठी येथे कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव यांच्या नेतृत्वात समस्त काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मुख्य उपस्थितीत बजावलेल्या ईडी नोटीसचा निषेध दर्शवित नारे प्रदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी कामठी शहर काँग्रेस अध्यक्ष कृष्णा यादव, माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर,माजी नगराध्यक्ष नीरज यादव,आबिद ताजी, मुस्ताक अहमद, अहफाज अहमद,सुलेमान अब्बास,राजकुमार गेडम,मोहम्मद आरिफ,फारूक कुरैशी,अब्दुल सलाम अंसारी,मोहम्मद सुल्तान,सुरैया बानो,आकाश भोकरे,आशिष मेश्राम,शाम लेंगगांवर,एहफूज कुरैशी,मंजू मेश्राम,राजमणि तालेवार, शमसुन निशा,पप्पू चिमंनकर,अंबिका रामटेके,अनिता खोब्रागडे, जेटली यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.