नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ०३.०८.२०१३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पो. ठाणे सदर, सदर व पांचपावली नागपूर चे हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अंकुश उर्फ मुंगुस वल्द नरेश मसराम, वय ३० वर्षे, रा. आदीवासी खदान वस्ती, गोंडवाना चौक, बैरामजी टाउन, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कुर्याांना आळा घालणे संबंधी अधिनियम १९८१ अंतर्गत दिनांक ०३.०८.२०१३ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. ०३. ०८. २०२३ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
अंकुश उर्फ मुंगुस वल्द नरेश मसराम, याचे विरुद्ध पो.ठाणे सदर, जरिपटका आणि पांचपावली, नागपूर शहर येथे शस्त्रानिशी गंभीर दुखापत करणे, प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशिर जमाव तयार करून घरात प्रवेश करून अश्लील शिवीगाळ मारहाण घरातील सामानाचे नुकसान करणे, दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे, अमली पदार्थ विक्री करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगने. प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, अश्लील शिवीगाळ मारहान करून जिवे मारण्याची धमकी देने, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर प्रस्तावित स्थानबध्द इसमावर चांगल्या वर्तणुकीसाठी पो. ठाणे सदर अंतर्गत २०२० २०२२ मध्ये कलम ११००६) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. सदर प्रस्तावित स्थानबध्द इसमाकडुन चांगल्या वर्तणुकीसाठी दोन वर्ष मुदतीचे अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते. परंतु प्रस्तावित स्थानवाद इसमाने सदर उल्लेखन पो. ठाणे सदर व जरिपटका हददीत अश्लिल शिवीगाळ करणे, प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवुन दंगा करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्राणघातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे अंकुश उर्फ मुंगुस वल्द नरेश मसराम, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस थाणे सदर, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानव प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानवाट इसमाविरुध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरुध्द स्थानबध्दतेची महत्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे…