शहरी अशा वर्कर यांच्या प्रश्नावर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासोबत बैठक संपन्न

नागपूर :-आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नागपूर जिल्हा तर्फे महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांच्यासोबत कॉ.राजेंद्र साठे यांचे नेतृत्वात विविध विषयाला घेऊन बैठक संपन्न झाली. आरोग्यवर्धिनीचा निधी प्रत्येक आशाला कामानुसार सरसकट देण्यात यावा, महिन्यातुन २५ ते ३० फॉर्म आशा वर्कर कडून भरून घेण्यात यावे त्यापेक्षा जास्त ची ताकीद करू नये, आशा वर्कर यांना प्रताडीत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, २० ते १९ पर्यंत महिना गृहीत धरून मासिक मीटिंग २१ ते २८ चे दरम्यानच घेऊन महिन्याच्या १ तारखेला खात्यात मानधन जमा करावे, २८ तारखेच्या आधी मासिक रिपोर्ट सादर न करणाऱ्या आशा वर्कर चे मानधन थांबवण्यात यावे, कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण निधी कमीत कमी वेळात खात्यात जमा करावा, हत्तीरोग सर्वेक्षण मोहीमचा निधी ज्यांना आतापर्यंत मिळालेला नाही तो त्वरित आश्यांच्या खात्यात वळता करावा, वारंवार आशा वर्कर यांचे कार्यक्षेत्र बदलू नये, वारंवार कोणत्याही वेळेस यु पी एच सी मध्ये बिनकामाने बोलवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना मध्ये चाललेला घोळ थांबवण्यात येऊन आशा वर्कर यांचे नुकसान होणार नाही असा सोयीस्कर मार्ग काढण्यात यावा, डॉ. सेलोकर यांनी राष्ट्रीय कार्यक्रमावर बहिष्कारचा प्रश्न उपस्थित केला असता सी आय टी यू राष्ट्रीय कार्यक्रमावर कधीही बहिष्कार घालत नसून जास्त मोबदला आशांना कसा मिळवून देता येईल? यावर प्रयत्न करत असते असे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांनी सांगितले. त्यावर बोलताना कॉम्रेड साठी यांनी सांगितले की ५० दिवसाचा संप चालू असताना पोलिओ कार्यक्रम 3 मार्च पासून चालू होणार होता परंतु शून्य ते पाच वयोगटातील बालक वंचित राहू नये त्याकरता काही कालावधी करता १ मार्च रोजी संप थांबवून चांगल्या पद्धतीने पोलिओचा राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्यात आला, आशा वर्कर यांचे रहिवासी क्षेत्र बदलले असेल तर मागणीप्रमाणे रहिवासी क्षेत्रा जवळ रिक्त असलेले जागी त्या आशाची नेमणूक करण्यात यावी. अशा विविध विषयावर चर्चा केली असता डॉ. दीपक सेलोकर यांनी त्वरित मार्ग काढण्याचे आश्वासन दिले बैठकीला डॉ. दीपक सेलोकर, डॉ. सरला लाड, सीपीएम -अश्विनी निकम व गटप्रवर्तक – रेखा निखाडे सह सीटू तर्फे कॉ. राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, लक्ष्मी कोत्तेजवार, माया कावळे, सुकेशिनी उमरेडकर सह विविध आरोग्य केंद्रातील प्रति केंद्रातून १ प्रमाणे ५० पेक्षा अधिक आशा वर्कर उपस्थित होत्या आशा वर्कर यांच्या समस्या वर विशेष लक्ष देऊन त्वरित सोडवण्याकरता काही पदाधिकाऱ्यांची त्वरित मीटिंग घेण्यात आली त्यावर निर्णय घेताना जिल्हाध्यक्ष -कॉ.राजेंद्र साठे यांच्या नियंत्रणामध्ये विषय मानधन वाढ व मासिक मानधन ही जिम्मेदारी -कॉ. प्रिती मेश्राम, आरोग्यवर्धिनी व सिबॅक फॉर्म -कॉ. रंजना पौनीकर, कुष्ठरोग -क्षयरोग मोहीम -कॉ. माया कावळे, हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम -कॉ. लक्ष्मी कोत्तेजवार, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना -कॉ.सुकेसीनी उमरेडकर यांचेकडे सोपवण्यात आली असून वरील संबंधित विषयावर ठरलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी असा निर्णय घेण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सातत्य हेच श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे यश - पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन

Tue Jun 11 , 2024
– १०८ जोडपे एकाचवेळी चढले बोहल्यावर यवतमाळ :- ‘मानव सेवा हीच माधव सेवा’ या भगवान श्री सत्यसाई बाबांच्या उपदेशाने प्रेरीत होऊन डॉ. प्रकाश नंदूरकर गेल्या ३० वर्षांपासून सर्वधर्मीय गरीब, गरजू कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावून देतात. सातत्य आणि हाती घेतलेल्या काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असल्यानेच त्यांचे कार्य उत्तरोत्तर वाढत आहे, असे प्रतिपादन श्री सत्यसाई सामूहिक विवाह मेळावा आयोजन समितीचे अध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com