एक ट्रॅक्टर, ट्राॅली आणि एक ब्रास रेती सह एकुण ९ लाख ५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच किमी अंतरावर असलेल्या सिहोरा कन्हान नदी पात्रातुन अवैध रेती वाहतुक करताना कन्हान पोलीसांनी एक ट्रॅक्टर, ट्राॅली व एक ब्रास रेती सह पकडुन एकुण ९ लाख ५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे कन्हान ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.२) नोव्हेंबरला रात्री १ ते १:३० वाजता दरम्यान कन्हान पोलीस स्टेशनचे नापोशि मंगेश सोनटक्के, पोशि गणपत सायरे आदी सब पोलीस कर्मचारी आपल्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमी दाराकडुन माहीती मिळाली की, सिहोरा गावात असलेल्या कन्हान नदीचा पात्रातुन ट्रॅक्टरचा साह्याने अवैधरित्या रेतीची चोरी होत आहे. अशा विश्वसनीय खबरे वरून कन्हान पोलीस घटनास्थळी पोहचले असता पोलीसांना पाहुन सदर ट्रॅक्टरचा चालक हा त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर सोडुन पळुन गेला. कन्हान पोलीसांनी ट्रॅक्टर क्र. एम एच ४० बीई ११२७ किंमत ५.००,००० रू, ट्रॉली क्र. एम एच ४० – ४३५१ किंमत ४,००,००० रू, व एक बॉस रेती किंमत ५००० रूपये असा एकुण ९,०५,००० रू. चा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आले. सरकार तर्फे फिर्यादी पोशि गणपत सायरे यांच्या तक्रारी वरून पोस्टे कन्हानला दोन आरोपी विरुद्ध अप.क्र ६२२/ २०२२ कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे एसआई गणेश पाल, विरेंद्र चौधरी हे करीत आहे.