फसवणुक करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- फिर्यादी दमयंती समशेर बहादुरसिंग वय ६९ वर्ष रा. गिरीपेठ, सिताबर्डी, नागपूर हया त्यांचे घरातील कुकर दुरूस्ती करीता आल्या असता, पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत बैंक ऑफ बडोदा, गिरीपेठ ते गायत्री भोजनालय दरम्यान त्यांना दोन अनोळखी आरोपी ईसम भेटले. आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेवुन सांगीतले की त्यांना गरीब मुलाची मदत करायची आहे असे म्हणुन फिर्यादीस भोजनालयाकडे नेले व फिर्यादी कडे एक निळ्या रंगाची पॉलीथीन, त्यामध्ये ५,००,०००/- रू असलेली देवुन आम्ही गरीब मुलाला जेवन देवून येतो असे म्हणून आरोपींनी फिर्यादी जवळील सोन्याच्या बांगड्या, जुने वापरते सोन्याचे लॉकेट असा एकुण २,१०,०००/- रू चा मुद्देमाल फसवणुक करून घेवुन गेले, आरोपी गेल्यावर फिर्यादी यांनी पॉलीथीन मधील पैश्याचे बंडल काढुन पाहिले असता त्याचे वरील बाजुस एक ५००/- रू ची नोट व खाली कोरे कागद असल्याचे दिसले, फिर्यादीची फसवणुक झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे कलम ४२०, ४१७ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता,

गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून दिल्ली सायबर पोलीसांचे मदतीने आरोपोंने लोकेशन प्राप्त केले व सापळा रचुन आरोपी क. १) संजय रामलाल सोलंकी वय २७ वर्ष रा. कराला, शिवविहार, उत्तर पश्चिम दिल्ली २) गोविंद उकाराम राठोड वय ४९ वर्ष रा. रघुवीर नगर, उत्तर दिल्ली यांना ताब्यात घेवुन त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपींनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली, आरोपींचे ताब्यातुन सोन्याच्या दोन बांगडया, सोन्याचे लॉकेट, दोन मोबाईल फोन व रोख ४९,०००/- रू असा एकुण २,१६,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता सिताबर्डी पोलीसांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली मसपोनि माधुरी नेरकर, पोउपनि नवनाथ देवकाते, सफौ ईश्वर खोरडे, मिलींद चौधरी, मुकेश राउत, पोहवा अनुप तायडे, विनोद गायकवाड, नापोअ, अमोल जासुद, संतोष चौधरी, अनिल बोटरे, मनिष रामटेके, पोअ. अजय रोडे, प्रदीप पवार, मनिष बुरडे, संतोष गुप्ता, संदीप पडोळे यांनी केली.

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार मारणाऱ्या आरोपीस अटक

Sat Feb 3 , 2024
नागपूर :- दिनांक ०२.०२.२०२४ चे २३.०० वा. ते २३.१५ वा. चे दरम्यान, फिर्यादीचे पती नामे मंगेश गणेश मेंडे, वय ४५ वर्षे, रा. उन्नती कॉलोनी, समता नगर, नारी रोड, कपिलनगर, नागपुर यांना त्यांचा परिचीत आरोपी नामे दत्तु उर्फ दत्त्या उर्फ राहुल रमेश रामटेके वय १९ वर्ष रा. मानव नगर, टेक्ानाका नारी रोड, नागपूर हा पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत संन्याल नगर, टेकानाका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com