श्री नारायण देव महापूजा (बीज ) कार्य्रमाचे आयोजन २३ जानेवारीला

सावनेर :- दरवरषीप्रमाणे यावर्षी सुध्दा श्री नारायण देव महापूजा ( बीज) कार्यक्रमाचे आयोजन २३ जानेवारीला खापा ( सावनेर ) येथील धोंडबाजी लाड रंगारीपुरा येथे केले आहे.

२३ जानेवारीला सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत पशू पकडण्यात येईल. तर सायंकाळी पाच वाजता भिक्षा मागनी करण्यात येणार आहे. २४ जानेवारीला नारायण देवाची पालखी सोहळा शहराच्या विविध मार्गाने भ्रमण करीत सायंकाळी नारायण देवाची महापूजा करण्यात येईल.२५ जानेवारीला महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम होईल. या धार्मिक कार्यक्रमात श्री नारायण देव भजन मंडळच्या वतीने जागृती भजन,गीत गायनाचा कार्यक्रमही होणार आहे.या कार्यक्रमाला कामठी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदू कोल्हे व सचिव दिलीप मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन येमुणाबाई लाड,कमला लाड, सुशीला लाड, माधोराव लाड,रमेश लाड,गणपत लाड, चींधाबाई लाड,बबनराव लाड, शशिकला लाड,मनोहर लाड,रामकृष्ण लाड, कुंदा लाड,पंढरी लाड, उषा लाड, सुरेश लाड,मंगला लाड, योगेश लाड,अश्विनी लाड,जानराव लाड, येमुनाबाई लाड, नारायण लाड,मिरा लाड,मधुकर लाड, सुंदरबाई लाड, प्रवीण लाड,कोमल लाड,दौलत लाड इत्यादी सह असंख्य समाज बांधव अथक परिश्रम घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com