निवडणूक निरिक्षक एम.मल्लीकार्जुन नायक दाखल

यवतमाळ :- यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने केंद्रीय सामान्य निरीक्षक म्हणून आयएएस अधिकारी एम. मल्लीकार्जुन नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नायक हे यवतमाळ येथे दाखल झाले आहे.

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिनांक 26 एप्रिल रोजी होणार आहे. सदर निवडणुकीची अधिसूचना दिनांक 28 मार्च रोजी प्रसिध्द झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.4 एप्रिल आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख दि.8 एप्रिल आहे. लोकसभेची निवडणूक निष्पक्ष तथा खुल्या वातावरणात घेण्याच्यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने केंद्रीय सामान्य निरीक्षक म्हणून एम. मल्लीकार्जुन नायक यांची नियुक्ती केली आहे. नायक यांचे कार्यालय नवीन विश्रामगृह, वाघापूर रोड, सिव्हील लाईन, यवतमाळ सुरु करण्यात आले आहे.

निवडणूक व्यवस्थेबाबत कोणतीही तक्रार किंवा सूचना असल्यास उपरोक्त पत्त्यावर पाठवाव्या किंवा दुपारी 3 ते 5 दरम्यान कार्यालयास संपर्क साधता येईल. सामान्य निरीक्षक नायक हे 9370865239 भ्रमणध्वनी क्रमांकावर देखील उपलब्ध असतील, असे निरिक्षकांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाविकास आघाडीमुळेच वीज दरवाढ, आंदोलन आश्चर्यकारक - भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांची टीका

Fri Apr 5 , 2024
मुंबई :- शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना महावितरणवर मोठा आर्थिक बोजा आल्यामुळे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात वीज दरवाढ लागू झाली. महावितरणचा वाढीव खर्च आणि त्यामुळे झालेली वीजदरवाढ याला सर्वस्वी महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असून सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आघाडीच्या नेत्यांनी आता वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलन करणे आश्चर्यकारक आहे, अशी टीका भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com