संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सोनू रेडिमेड स्टोर्स चे प्रशांत गजभिये ची बजाज फायनान्सच्या नावावर 3 लक्ष रुपये कर्ज देण्याच्या नावाखाली प्रोसेसिंग फी च्या नावावर मोबाईल क्र 86959894752 व 9831562251 चा आरोपी धारकाने 1 लक्ष 23 हजार 49 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नुकतेच उघडकीस आली असून यासंदर्भात फिर्यादी प्रशांत अनिल गजभिये वय 30 वर्षे रा हमालपुरा कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 420 सहकलम 66(सी)आय टी ऍक्ट अंनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.