कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राख बंधारा फुटला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यात येणाऱ्या कोराडी येथील महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राख बंधाऱ्याच्या आतील एक पाणी अडवणारा बंधारा आज मंगळवारी पहाटे अचानक फुटला. कोराडी मंदिराच्या मागील बाजूस घडलेल्या या घटनेमुळे तेथे राख उचलण्यासाठी गेलेले आठ ट्रक पाण्यात बुडाल्याने एकच खळबळ माजली.सुदैवाने कुठलीही जीवितहानी घडली नाही.

कोराडी वीज निर्मिती प्रकल्पातून निघणारी राख येथील एका राख बंधाऱ्यात साठवून ठेवली जाते. या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात महानिर्मितीकडून नियुक्त कंत्राटदार नित्याने राख उचलून वितरीत करतात. दरम्यान मंगळवारी पहाटेपासून येथे बंधाऱ्याच्या आतमध्ये राख उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी एका जेसीबीचा पंजा आतमधील पाणी अडवलेल्या बंधाऱ्यावर पडला. त्याने बंधाऱ्यातील पाणी बाहेर झिरपू लागले. दरम्यान हळू- हळू पाण्याचा वेग वाढला. थोड्याच वेळात राखेची उचल होणाऱ्या भागात हे पाणी शिरले. यावेळी येथे राखेची उचल करण्यासाठी उभे असलेले आठ ट्रक पाण्यात बुडाले. ही माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांचे धाबे दणाणले. तातडीने काही अधिकारी घटनास्थळी पोहचले.

महानिर्मितीच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, कोराडी प्रकल्पातील राख बंधाऱ्यातील राख नि:शुल्क वितरीत केली जाते. ही राख उचलण्याचे काम खासगी व्यक्तीकडे आहे. येथे राख उचलून नेण्यासाठी पाण्याची अडचण होऊ नये म्हणून मध्ये पाणी अडवण्यासाठी राखेचा एक बंधाराही तयार आहे. मंगळवारी पहाटे राखेची उचल करताना चुकीच्या ठिकाणी खोलगट भाग तयार झाल्याने पाणी अडवून ठेवणारा हा बंधारा फुटला. बंधाऱ्यातील पाणी राखेची उचल सुरू असलेल्या भागात गतीने शिरले. पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की काही वेळातच हे ट्रक पाण्यात बुडाले. या घटनेने राखेची उचल करणारे ट्रकचे नुकसान वगळता इतर कोणतेही नुकसान झाले नसल्याचा महानिर्मितीचा दावा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Tue Feb 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अशोक नगर येथील कुख्यात बदमाश तेनाली राऊत याचा राहत्या घराची कन्हान पोलीसांनी झडती घेतली असता अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याचे मिळुन आल्याने पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.४) जानेवारी ला सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान तेनाली राऊत रा. कन्हान हा आपल्या साथीदारसह धारदार शस्त्र घेऊन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com