दसरा दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद

नागपूर :- “दसरा” दिनानिमित्त बुधवार दिनांक 05 ऑक्टोंबर, 2022 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक 02/09/2018 रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्र.240 दिनांक 02/07/2018 अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक 03/08/2018 चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार बुधवार दिनांक 05 ऑक्टोंबर, 2022 ला “दसरा” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com