पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 5 कोटींची तरतूद – मंत्री दादाजी भुसे

 मुंबई :- परभणी जिल्ह्यातील पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

            पाथरी येथील बसस्थानकातील छताचे प्लास्टर कोसळून तीन महिला जखमी झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुरेश वरपूडकर, अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला होता.

मंत्री भुसे म्हणाले, या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर या जखमी महिलांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे. तसेच या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून लवकर काम सुरू करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कौशल्य ओळखून ज्ञान आत्मसात करा- प्रवीण टाके

Tue Jul 18 , 2023
Ø पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याला उर्त्स्फूत प्रतिसाद Ø 200 उमेदवारांची प्राथमिक निवड नागपूर :- ‘कौशल्य’ हा शब्द माणसाच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास निर्माण करतो . विद्यार्थीदशेत कौशल्यावर आधारीत ज्ञान संपादन केल्यास यश मिळविणे सोपे होते, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी आज येथे केले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय व श्री निकेतन आर्टस् कॉमर्स कॉलेज यांच्या संयुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!