कामठी तालुक्यातील चावड्या चावड्यावर रंगू लागल्या निवडणुकीच्या गप्पा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येत्या 19 एप्रिल ला होऊ घातलेल्या रामटेक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, बसपा ,अपक्ष असे एकूण 28 उमेदवार निवडणूक रिंगणात असून निवडणुकीच्या प्रचार धुमाळीला आता वेग आला आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या उमेदवाराने प्रचार सभा, प्रचार दौऱ्याला गती दिली आहे.त्यातच सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेले रश्मी बर्वे यांचा जात पडताळणी अर्ज, सदस्य रद्द, नामनिर्देशन पत्र रद्द विषय, त्यानंतर रश्मी बर्वे यांचे पती महाविकास आघाडी चे उमेदवार, भाजप चा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करून वंचित चे उमेदवार शंकर चहांदे यांचा अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना दिलेला पाठींबा आदी विषयान्वये कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील चावड्या चावड्या वर निवडणुकी संदर्भातील चर्चा रंगू लागल्या आहेत.

तर निवडणूक रिंगणात असलेल्या पक्षीय उमेदवाराचा कार्यकर्ता हा आपला पक्षाची भूमिका मांडत असून आपला पक्ष सत्तेवर असताना काय कामे केली होती काय कामे करणार आहे. यात विरोधी पक्षाच्या कार्यकर्ता सत्तेवर असताना काय चुका केल्या हे मांडत आपला पक्ष काय कामे करणार हे पटविताना दिसत आहे.तर कित्येक ठिकाणी शाब्दिक चकमक सुद्धा होताना दिसत आहे.कामठी बस स्टँड च्या बाजूला असलेले चहा ची दुकान, पेपर ची दुकान, लस्सी ची दुकान आदी ठिकाणी निवडणूक चर्चेला रंगत आणताना दिसत आहेत.तसेच रामटेक लोकसभा निवडणुकीचे समीकरण कसे असणार, कोण उमेदवार निवडून येणार आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा आराखडा चर्चेतून तयार केला जात आहे.तसेच या निवडणुकीत तरुण वर्ग जास्त प्रमाणात उत्साहित दिसत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उद्या 5 एप्रिल रोजी शहरात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave)

Thu Apr 4 , 2024
– हवामान विभागाचा यलो अलर्ट – नागरिकांना सतर्कतेचा इशारा चंद्रपूर :- हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या दि.5 एप्रिल रोजी चंद्रपूर शहरात दिवसा तसेच रात्रीही उष्णतेची लाट राहणार असुन याबाबत यलो अलर्ट देण्यात आला आहे.यंदा एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच प्रचंड उकाडा जाणवू लागला असुन सर्वांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यास सतर्क राहण्याचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com