रासेयो राबविणार प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान एन.एम.डी काँलेजचा स्तूत्य उपक्रम

अमरदीप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व एन.एम.डी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना च्या संयुक्त विद्यमाने दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्यात“फटाके मुक्त व प्रदूषण मुक्त दिवाळी” अभियान राबवीत आहे. यामुळे लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होत आहे. यावर्षी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने “प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान” अंर्तगत रासेयो स्वयंसेवक यांनी स्व:प्रेरणेने राबविण्याचे ठरविले असून महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पर्यावरण विभाग यांचे अभिनंदन व आभार मानले आहे. महाविद्यालय चे सभागृहात २१ आँक्टोबर रोजी दीपउत्सव कार्यक्रमाचे आयोजन संस्था सचिव माजी आमदार राजेन्द्र जैन, युवा संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रासेयो माजी जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. बबन मेश्राम, कार्यक्रम अधिकारी प्रा.रवीकुमार रहांगडाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान यशस्वी करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करुन शाळां-शाळांमध्ये जावून फटाक्याच्या दुष्परीणामांची पत्रक वाटणे, व्याख्याने देणे, विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेणे, पथनाट्याचे सादरीकरण करणे,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे, प्रबोधन करणे, प्रबोधन फेरीचे आयोजन करणे, यासारखे उपक्रम राबवीत आहे.फटाक्यामुळे होणारे ध्वनी व वायु प्रदूषण, अपघात,करोडो रुपयाचा चुराडा, पर्यावरणाचा ऱ्हास,याविषयी प्रबोधन करीत आहे.

यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्या डॉ. महाजन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून प्रदूषण करून स्वतःचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. याप्रसंगी रासेयोच्या ३०० स्वयंसेवकानी फटाके न फोडता वाचलेल्या पैशातुन विधायक कामे, विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करून किमान १०० रुपये वाचवा आणि वाचविलेल्या पैश्यातून चांगली पुस्तके, खेळणी, भेटवस्तू, मिठाई, गरिबांच्या घरी फराळ देणे, त्यांना आर्थिक, शैक्षणिक मदत करणे, सारख्या सामजिक कार्यांसाठी प्रोत्साहित होऊन प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.तसेच म.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्येकर्ता व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बबन मेश्राम यांनी मनोगत व्यक्त करतांना, फटाक्यांच्या यादुष्परिणामाबाबत जनजागृती व्हावी यासाठी समितीने सुरवात केलेले हे अभियान आता व्यापक स्वरुपात महाराष्ट्रातील शाळा-शाळांमध्ये यशस्वीपणे राबविले जात आहे. समितीच्या व रासेयो च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काही विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता वाचविलेल्या पैश्यातून विधायक काम तसेच पुस्तके घेणार आहेत. काही विद्यार्थ्यांनी या वाचलेल्या पैश्यातून गरीब विद्यार्थ्यांना चप्पल व बॅगा देणार आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी बनविलेले दिवाळीचे पदार्थ झोपडपट्टीतील मुलांना देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ओम परमार यांनी तर आभार शिवानी हाडगे हिने मानले. यशस्वीतेसाठी चाहत मेश्राम, झामसिंग बघेले, मनिष दहिकर, देवेश ठाकरे, चंद्र कुमार पडोले, शिवम घोडेस्वार, सागर चंद्रोल, विठ्ठल निमकर, काजल धोटे,पुनम वाघाडे,सेजल तिवरी,श्रेयस थानथराटे, महेंद्र बावणे, रोहित मेंन्ढे, सुर्दशन बोरकर, चेतन डोहरे, प्रिन्स रहागडाले, मोहित चौधरी सह रासेयो स्वंयसेवक यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संसार सागर मे अनन्य जीवों से मनुष्य जीवन श्रेष्ठतम एवं सौभाग्यशाली है - शंकराचार्य के प्रधान शिष्य ब्रम्हचारी ऋषिकेश के उदगार

Sat Oct 22 , 2022
कोराडी :- संसार सागर मे अनन्य जीवों की तुलना मे मनुष्य जीवन बडा ही सौभाग्यशाली माना गया है।कोराडी के श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान मे आयोजित वैदिक सनातन धर्म सम्मेलन मे गोवर्धनपीठ के जगतगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानन्द सरस्वती महाराज के प्रधान शिष्य ऋषिकेश ब्रम्हचारी  महाराज ने कहा कि अहार निंद्रा और मैथुन जलचर थलचर नभचर और भूगर्भीय सूक्ष्म से सूक्ष्म जीवों […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com